कोरची,
emrs korchis आदिवासी विद्यार्थ्यांच्या उंच भरारीचे आणखी एक उदाहरण देत, गडचिरोली जिल्ह्यातील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल (ईएमआरएस) कोरचीने राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये आपला ठसा उमटवला आहे. नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या 5 व्या ईएमआरएस राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत शाळेतील एकूण 14 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी सहा विद्यार्थ्यांची थेट ओडिसा येथील राउलकेला येथे होणार्या राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाल्याची गौरवास्पद घोषणाही करण्यात आली.
राष्ट्रीय स्तरावर निवडलेल्या खेळाडूंमध्ये हँडबॉल (19 वर्षांखालील मुली) संघातील खुशी फुलचंद सोनार, कल्याणी जागेश्वर राऊत, वैष्णवी महेश गावडे, दिव्या चेनुराम होळी, शॉट पुट (गोळा फेक) मधील 14 वर्षांखालील मुलींमध्ये नव्या रामजी गावडे व 19 वर्षांखालील मुलींमध्ये आरती कचरू मडावी यांचा समावेश आहे. शाळेचे प्राचार्य धर्मेंद्र सिंह ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे आणि क्रीडा मार्गदर्शक अंजली नेगी यांचे कठोर परिश्रम, मेहनत आणि मिळवलेल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन केले. शाळेच्या या यशामुळे कोरची आणि संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे.emrs korchis राष्ट्रीय स्तरावरील आगामी स्पर्धेतही या विद्यार्थ्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांच्या तयारीसाठी शाळा आणि क्रीडांगणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हे यश पुढील अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडाक्षेत्रात प्रेरणा देणारे ठरणार आहे.