सलग आठ दिवस पर्यावरण जागृती अभियान

*बहार नेचर फाउंडेशनद्वारे पक्षी सप्ताहाचे आयोजन

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
वर्धा,
bahar nature foundation राज्यभर सर्वत्र ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षीसप्ताह साजरा केला जात असून या निमित्ताने जिल्ह्यात बहार नेचर फाउंडेशनद्वारे विविध प्रकारच्या अधिवासात पक्षी निरीक्षण तसेच पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहे. पक्षी सप्ताहाचे उद्घाटन स्थानिक आसमंत स्नेहालय येथे बुधवार ५ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, विधि सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. विवेक देशमुख, समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर, आसमंत स्नेहालयचे संचालक शिवाजी चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
 

बाहेर foundation  
 
 
सप्ताहानिमित्त सलग ८ दिवस दररोज सकाळी ७ ते ९ या दरम्यान विविध प्रकारच्या अधिवासात पक्षीनिरीक्षण करण्यात येणार आहे. यात बुधवारी सकाळी बुद्ध टेकडी परिसर, गुरुवारी बोर व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटन भवनात पक्षी व पर्यावरण कार्यशाळा, शुक्रवारी सकाळी रोठा तलाव व दुपारी हिंगणघाट तालुयातील सातेफळ येथील आश्रमशाळेत पक्षी जाणीव जागृती उपक्रम, शनिवारी कारंजा तालुयातील राहाटी येथील उच्च प्राथमिक शाळेत तर रविवारी सुसुंद येथील उच्च प्राथमिक शाळेत पक्षी जाणीव जागृती उपक्रम, सोमवारी सकाळी दिग्रस तलाव व दुपारी महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या केंद्रीय विद्यालयात पक्षीजागर उपक्रम आणि मंगळवारी पवनार येथील धाम नदी परिसरात पक्षी निरीक्षण करण्यात येईल. या अभियानात शालेय कार्यक्रमांमध्ये पक्षीचित्र प्रदर्शनीही लावण्यात येणार आहे. या सप्ताहाचा समारोप बुधवार, १२ रोजी सकाळी ९ वाजता सालोड येथील महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाच्या वनौषधी उद्यानात करण्यात येईल. या उपक्रमात निसर्गप्रेमी नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बहारचे अध्यक्ष डॉ. बाबाजी घेवडे, मानद वन्यजीव रक्षक तथा उपाध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, उपाध्यक्ष दीपक गुढेकर, सचिव जयंत सबाने, राजदीप राठोड, सहसचिव देवर्षी बोबडे, प्रा. किशोर वानखडे, अतुल शर्मा, डॉ. आरती प्रांजळे घुसे, दर्शन दुधाने, अ‍ॅड. पवन दरणे, घनश्याम माहोरे, स्नेहल कुबडे यांनी केले आहे
पक्षीसप्ताह आणि वर्धेकरांचे योगदान
दिवंगत पक्षीतज्ज्ञ व लेखक मारुती चितमपल्ली यांचा ५ नोव्हेंबर हा जन्मदिवस तर १२ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्तपक्षी तज्ज्ञ दिवंगत डॉ. सालीम अली यांचा जन्मदिवस आहे.bahar nature foundation पक्ष्यांचा अभ्यास आणि संशोधनाकरिता आयुष्य वेचणार्‍या यापक्षीतज्ज्ञांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बहार नेचर फाउंडेशनद्वारे सेवाग्राम येथे झालेल्या विदर्भ पक्षिमित्र संमेलनात सदर तारखां दरम्यान पक्षी सप्ताह जाहीर करण्याची मागणी सर्वप्रथम करण्यात आली होती. त्यानुसार राज्य सरकारने या संदर्भात अधिकृत घोषणा करीत शासकीय स्तरावरपक्षीसप्ताह साजरा करण्याचे अध्यादेश काढले.