कार्तिकी एकादशी निमित्त भक्तिमय कीर्तनाने रंगली श्रद्धा

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Kartiki Ekadashi श्री सिद्ध गणेश मंदिर, बुटी लेआऊट, लक्ष्मीनगर येथे कार्तिकी एकादशीनिमित्त मुकुंद घारपुरे यांचे कीर्तन झाले. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराजांचा “पंढरीशी जाईन आले या संसारा” हा अभंग निरूपणासाठी घेतला. त्यांच्या प्रभावी वाणीमुळे भक्तगण मंत्रमुग्ध झाले. कीर्तनाच्या उत्तरार्धात संत चोखामेळा यांच्या “नासलेले अमृत पुन्हा कसे गोड झाले” या भक्तीमय कथेद्वारे खरी भक्ती कशी असावी, याचे सुंदर वर्णन करण्यात आले. कार्यक्रमाला अनेक भक्त मंडळी तसेच मंदिराचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

kiratn 
 
सौजन्य: अंजली साठे, संपर्क मित्र