मानोरा,
farmers in pandan roads तालुक्यातील असोला खुर्द या गावातील शेतकर्यांसह हातोली, चाकूर, माहुली व भुली या गावातील शेतकर्यांकडे शेती असूनही शेतशिवारात जाण्यासाठी पांदण रस्ते नसल्यामुळे शेतकर्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असून, शासन प्रशासनाकडे वारंवार अर्ज विनंती करूनही कुठलाच उपयोग होत नसल्याने शेतकर्यांसह आंदोलन करण्याचा इशारा असोला खुर्द येथील उपसरपंचांनी शासनाला दिला आहे.

असोला खुर्द सह अनेक गावातील शेतकर्यांना शेत शिवारात जाण्यासाठी पांदण रस्ते नाहीत, रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचलेला असल्यामुळे बैलगाडी, ट्रॅटर तर सोडा पायी जाणे सुद्धा अवघड झाल्याने अनेक शेतकरी आपली शेती पडीत ठेवतात. काही शेतकर्यांनी शेती पेरली तर रस्त्याअभावी कृषी माल शेतातच ठेवावा लागतो. शेती असूनही प्रशासकीय अनावस्थेचा त्रास या भागातील शेतकरी सोसत असून, उदरनिर्वाहाचे साधनच अवरूद्ध झाल्याने शेतकर्यांना रोजगारासाठी महानगरांची धाव घ्यावी लागते याचा मोठा फटका कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणावर पडत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.farmers in pandan roads आसोला खुर्द प्रवेशद्वार (फाटा) ते भुली फाटा हा पांदण रस्ता तातडीने निर्माण करण्याकरिता सुद्धा स्थानिक नागरिक व शेतकर्यांच्या वतीने आग्रहाची मागणी करण्यात आली असून, ह्या जोड रस्त्यामुळे दोन्ही गावातील नागरिकांची व तीर्थक्षेत्र असोला येथे येणार्या भाविक भक्तांची दळणवळणाची जलद सोय होणार आहे. असोला गावातील पांदण रस्ते आणि आसोला भुली जोड रस्ता करण्यात न आल्यास गावकर्यासमवेत ४ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय येथे उपोषणाला बसणार असल्याचे उपसरपंच बादल भीमसिंह राठोड यांच्या वतीने निवेदनाद्वारा प्रशासनाला कळविण्यात आले आहे.