वर्धा,
rabi seeds जून ते सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकर्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने पुढाकार घेत ३१ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. या पॅकेज अंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्यांना रबी पिकांची लागवड करण्यासाठी बियाणे व तत्सम खरेदीसाठी हेटरी १० हजार रुपयांची मदत ३ हेटरपर्यंत करण्याबाबत २८२ कोटी १८ लाख रुपयांचा प्रस्ताव पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारातून राज्य शासनाला सादर करण्यात आला. लवकरच ही मदत शेतकर्यांना देण्यात येईल, अशी माहिती ना. भोयर यांनी दिली. अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यात विदारक स्थिती निर्माण झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शेतकर्यांना मदतीचा आधार देण्यासाठी ३१ हजार कोटींची तरतूद केली. या तरतुदीअंतर्गत शेतकर्यांना आर्थिक मदत करण्यासोबतच रब्बीत बियाणे खरेदीसाठी देखील मदत करण्यात येत आहे. आर्थिक मदत शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आली असून काही शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ना. भोयर यांनी सांगितले.
१२९९ गावांतील शेतकर्यांना मिळणार मदत
वर्धा तालुयातील १५५ गावांतील २८ हजार ४२ शेतकर्यांचे ४० हजार ४८० हेटर मधील नुकसान झाले होते. सेलू तालुयातील १६९ गावांतील २६ हजार ४८० शेतकर्यांचे २९ हजार ४७९ हेटरमधील, देवळी तालुयातील १५० गावातील २९ हजार ८१ शेतकर्यांचे ४० हजार २१५ हेटर, आर्वी तालुयातील १४७ गावातील २७ हजार १७८ शेतकर्यांचे ३३ हजार २८० हेटर, आष्टी तालुयातील १५४ गावातील १८ हजार ८४४ शेतकर्यांचे १४ हजार ५९४ हेटर, कारंजा तालुयातील १२० गावातील २७ हजार २१ शेतकर्यांचे २६ हजार ३८३ हेटर, हिंगणघाट तालुयातील १८७ गावातील ४१ हजार ९९ शेतकर्यांचे ४७ हजार ५१९ हेटर व समुद्रपूर तालुयातील २१७ गावातील ३६ हजार ८१६ शेतकर्यांचे ५० हजार ३५७ हेटर क्षेत्रातील शेत पिकांचे नुकसान झाले होते.rabi seeds या शेतकर्यांना रब्बी हंगामासाठी मदत मिळावी यासाठी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने २८२ कोटी १८ लक्ष रुपयांचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे.
शेतकर्यांच्या मदतीसाठी शासन कटिबद्ध
खरीप हातचे गेल्याने रब्बीमुळे त्याला आधार मिळावा, यासाठी राज्य सरकार शेतकर्यांना रब्बीचे बियाणे व अन्य बाबींसाठी प्रती हेटर ३ हेटर पर्यंत मदत करणार आहे. ही मदत शेतकर्यांना लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी कळवले आहे.