शिरपूर जैन,
knife attack शिरपूर बसस्थानक परिसरात १ नोव्हेंबर रोजी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास काही जणांनी विशाल गोपाल देशमुख (वय २३) या युवकावर जीवघेणा चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात २ नोव्हेंबर रोजी एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
शिरपूर येथे सध्या श्री मिर्झा मियॉ यांचा ऊर्स उत्सव सुरू असल्याने गर्दी होत आहे. शनिवारी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास विशाल देशमुख हे दुचाकीने शेताकडे जात असताना, बसस्थानकाजवळील चौकात फिर्यादीने दुचाकीचा हॉर्न वाजविला. त्यावेळी रस्त्याने जात असलेल्या तीन जणांनी हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून विशाल देशमुख यांच्यासोबत वाद घालत लाथाबुयांनी मारहाण केली. एका मुलाने चाकूने पोटावर वार करून फिर्यादीला गंभीर जखमी केले. जखमीला तातडीने अकोला येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.knife attack दरम्यान, तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून शेजारील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली तसेच प्रत्यक्ष साक्षीदारांना विचारपूस करून तपासाला गती दिली. या प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेतले असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.