आंदवार्ता ! लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर हप्ता उद्यापासून जमा

केवायसी करण्याचे आवाहन

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी जाहीर केले आहे की, उद्यापासून योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होऊ लागेल. प्रत्येक पात्र महिलेला १५०० रुपये देण्यात येणार आहेत.
 

 Ladki Bahin Yojana 
ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नसल्याने लाभार्थ्यांमध्ये काही काळ चिंता होती, मात्र आता सरकारने याची प्रक्रिया सुरू केली असून महिलांना दिलासा मिळाला आहे.महायुवती यांच्या नेतृत्वाखाली चालत असलेल्या "माझी लाडकी बहीण" योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी लवकरच जमा होईल, असे आदिती तटकरेंनी सांगितले.मंत्री आदिती तटकरेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. या योजनेची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी मागील महिन्यापासून [https://ladakibahin.maharashtra.gov.in](https://ladakibahin.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाभार्थ्यांनी १८ नोव्हेंबरपर्यंत ही ई-केवायसी पूर्ण करण्याची विनंती केली आहे.आदिती तटकरेंनी स्पष्ट केले की, ई-केवायसी न केल्यास पुढील हप्त्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाणार नाहीत. त्यामुळे महिलांनी शक्य तितक्या लवकर ऑनलाइन पद्धतीने केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.
 
 
 
योजना राबवताना सरकारचा उद्देश महिलांना आर्थिक सक्षमीकरण प्रदान करणे आणि त्यांच्या खात्यात निधी थेट पोहोचवणे हा आहे. पुढील दोन-तीन दिवसांत सर्व पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल, असे मंत्री तटकरेंनी स्पष्ट केले.