प्राॅपर्टी हडपणाऱ्या टाेळीच्या सूत्रधाराला अटक

- आठ महिन्यांपासून हाेता फरार : सदर पाेलिसांची कारवाई

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
property-grabbing-gang-arrested शहरातील विविध पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील भूखंडाचे बनावट दस्तावेज बनवून विक्री करणे किंवा बँकेत गहाण ठेवून लाखाेंचे कर्ज उचलणाऱ्या  टाेळीच्या सूत्रधाराला सदर पाेलिसांनी अटक केली. त्याने नुकताच सख्ख्या मामाच्याच घराचे बनावट दस्त नाेंदणी करुन दुसऱ्यालाच परस्पर विक्री करत लाखाे रुपयांचा गंडा घातला हे विशेष. सदर पाेलिसांनी रविवारी नाट्यमयरित्या सक्करदरा तलाव परिसरातील एका चहाच्या ठेल्याजवळून अटक केली. साैरभ प्रभाकर बासमवार असे मालमत्ता टाेळीतल्या ठगबाग भाच्याचे नाव आहे.
 
 
property-grabbing-gang-arrested
 
शहरात मालमत्तेच्या नावाने अनेकांना गंडा घालणाèया चार जणांच्या टाेळीतील निलेश पवनीकर, संदीप निंबरकर आणि भगवान या तिघांना यापूर्वीच पाेलिसांनी अटक केलेली आहे. त्यापैकी चाैथा ठगबाग साैरभ हा आठ महिन्यांपासून पाेलिसांना गुंगारा देत फरार हाेता. बनावट दस्त नाेंदणी तयार करत साैरभने आपला सख्खा मामा गणेश दर्शनवार यांचे सक्करदरा पाेलिस हद्दीतील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या पाठीमागील गवंडीपुरातले घर आपल्या नावावर करून घेतले हाेते. property-grabbing-gang-arrested मामाने आपल्याला बक्षिस म्हणून ही मालमत्ता दिल्याचे सांगून साैरभने भगवान नावाच्या एका व्यक्तीला बनावट मामा म्हणून उभे करत दुय्यम निबंधक कार्यालयात मालमत्तेची नाेंदणी करून घेतली हाेती. त्या बनावट दस्त नाेंदणीच्या आधारावर साैरभने मामाच्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे टाेळीतील सदस्य निलेश आणि संदीप या दाेघांना पुरवली. हे करण्यासाठी टाेळीकडून साैरभला साडेतीन लाख रुपयांची दलाली देखील मिळाली हाेती.
भूखंड ठेवायचे बँकांकडे गहाण
मामा दर्शनवार यांची मालमत्ता बळकावल्यानंतर या टाेळीने हे घर आवास आणि बंधन अशा दाेन बँकांकडे गहाण ठेवत लाखाे रुपयांच्या कर्ज उचलले. बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावलेली ही मालमत्ता साैरभ बासमवार हा चहाचे दुकान चालवणाèया एकाला विक्री करणार हाेता. त्याचा सुगावा लागल्यानंतर सदर पाेलिस ठाण्यातील अधिकाèयाने खरेदीदाराशी संपर्क साधला. तेव्हापासून पाेलिस साैरभच्या मागावर हाेते.
आठ महिन्यांपासून फरार
आराेपी साैरभ उत्तरप्रदेशात फरार झाला हाेता. तेथून ताे शनिवारी शहरात येणार असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यांनी सापळा रचत साैरभला अटक केली. साैरभसह या मालमत्ता टाेळीविराेधात यापूर्वीच बेलतराेडी, सक्करदरा, नंदनवन, हुडकेश्वर, पारडीसह आर्थिक गुन्हे शाखेतही गुन्हे दाखल आहेत. या टाेळीतील सदस्यांनी शहरातील विविध भागांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावलेल्या मालमत्तांची परस्पर विक्री करीत अनेकांना काेट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा आधीच तपास करत आहे.