अनिल कांबळे
नागपूर,
Maha Metro महामेट्राेतील अभियंत्याला शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी आपल्या जाळ्यात ओढत 22 लाखांनी गंडविले. सायबर पाेलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसीम राजा (42, चिंचभुवन) हे महामेट्राेत रेसिडेन्ट इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. ते शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचे. सप्टेंबर 2024 मध्ये साेशल माध्यमांवर त्यांनी शेअर ट्रेडिंगच्या एका लिंकला क्लिक केले व त्यात नाेंदणी केली. त्यानंतर 8923927015 या क्रमांकावरून त्यांना ाेन आला. तेथील एकता नावाच्या मुलीच्या सांगण्यावरून ते वन टू वन सर्व्हिस मॅनेजमेन्ट या ग्रुपवर अॅड झाले. काही दिवस शेअर ट्रेडिंग केल्यावर त्यातील अॅडमिनने आयबीकेआर नावाचे अॅप डाऊनलाेड करायला सांगितले. त्याच्या माध्यमातून ट्रेडिंग केल्यास जास्त ना हाेईल असे आमिष दाखविण्यात आले. त्यावरून वसीम यांनी अॅपच्या माध्यमातून ट्रेडिंग सुरू केले. त्यांनी सुरुवातीला रक्कम काढली व ती त्यांच्या बॅंक खात्यात आलीदेखील हाेती. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला व व त्यांनी जवळपास 22 लाख रुपये गुंतविले. त्यांनी 50 हजार रुपये काढले असता तेदेखील त्यांच्या बॅंक खात्यात आले. मात्र नंतर 10 लाख काढण्याचा प्रयत्न केला असता समाेरील आराेपींनी आणखी जास्त रकमेचा भरणा करण्याचा दबाव आणला. असे केले नाही तर कायदेशीर नाेटीस पाठविण्याची धमकी दिली. त्यामुळे वसीम यांनी कुठलेच पाऊल उचलले नाही. मात्र कुठलीही नाेटीस न आल्याने वसीम यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आराेपींविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.