नागपूर,
Ganesh Tekdi प्रति महिन्याप्रमाणे श्री गणेश टेकडी मंदिरात महाप्रसाद टीमतर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी कार्तिकी एकादशीचा उपवास असणाऱ्या भक्तांसाठी साबुदाण्याची खिचडी आणि केळी देण्यात आली, तर उपवास नसलेल्या भक्तांसाठी मसालेभात, वांग्याची भाजी, बुंदी आणि पोळीचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी सुमारे ४,००० गणेशभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सौजन्य: अरविंद पाठक, संपर्क मित्र