वर्धा,
Mahatma Gandhi International Hindi University,  महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा यांनी सोमवार, 3 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी शिष्टाचार भेट घेतली.  ही भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा यांनी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांना विश्वविद्यालयाच्या स्थापना दिवस कार्यक्रमासाठी आमंत्रित केले.
 
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी विश्वविद्यालयाच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामाची प्रशंसा केली.  या भेटीदरम्यान उभयतांनी नागपुरात होणाऱ्या आगामी पुस्तक मेळावा, साहित्य उत्सव तसेच विश्वविद्यालयाच्या विकासाशी संबंधित इतर विषयांवर सुद्धा सार्थक चर्चा केली.  ही भेट भविष्यातील शैक्षणिक तसेच संस्थागत सहकार्याची भावना बळकट करण्यास महत्त्वाची मानली जात आहे.