अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur cyber fraud सध्या सायबर गुन्हेगारांनी ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट केले असून गेल्या काही दिवसांत अनेकांची लाखाेंनी फसवणूक केल्याच्या घटना समाेर आल्या आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात सीबीआयकडून अटक करण्याची धमकी देऊन सायबर गुन्हेगारांनी दाेन ज्येष्ठ नागरिकांना 1.42 काेटीचा गंडा घातला. धंताेली येथील रहिवासी 61 वर्षीय तक्रारदार हे पूर्वी विदेशात काम करत हाेते.
या काळात त्यांनी कमावलेले पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले. सप्टेंबरमध्ये, आराेपींनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना माेठ्या नफफ्याचे आश्वासन देऊन शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवले. त्यांनी वृद्धाला एक लिंक पाठवली आणि व्हाॅट्सअॅप ग्रुपशी जाेडले. त्या ग्रुपमध्ये अनेक लाेक जाेडलेले असल्याचे दिसून आले. तक्रारदाराला प्रभावित करण्यासाठी, आराेपींनी त्यांना माेठ्या नफफ्याचे आश्वासन दिले. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी 1.08 काेटीची गुंतवणूक केली. त्यांच्या बनावट अॅपच्या खात्यात चार काेटी दाखविण्यात येत हाेते. तक्रारदाराने पैसे परत मागितले असता आराेपींकडून विविध कारणे देण्यात आली. काही कालावधीने आराेपींनी त्यांच्याशी संपर्कच ताेडला. ज्येष्ठ नागरिकाने सायबर पाेलिसांकडे तक्रार दाखल केली. पाेलिसांनी 84 माेबाइल ाेनधारकांविरुद्ध फसवणूक आणि आयटी कायद्याचे गुन्हे दाखल केले आहेत. आराेपींचे माेबाइल नंबर आणि बँक खात्यांवरून त्यांचा शाेध घेतला जात आहे.
दुसèया घटनेतील पीडित 70 वर्षीय व्यक्तीशी सायबर गुन्हेगारांनी संपर्क साधला. त्यांनी दिल्लीतील आयसीआयसीआय बँकेत त्यांच्या नावाने खाते असल्याचा दावा केला आणि ते पैसे मनी लाँड्रिंगसाठी वापरले जात असल्याचा दावा केला. संदीप नावाच्या एका कथित साथीदाराच्या मदतीने ज्येष्ठ नागरिक अवयव तस्करी व बालविक्री रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे सांगितले. त्या प्रकरणात सीबीआय खटला दाखल करण्यात आला आहे आणि त्यांच्याविरुद्ध अटक वाॅरंट जारी करण्यात आला आहे अशी बतावणी केली. यामुळे ज्येष्ठ नागरिक घाबरले त्यांनी 5 सप्टेंबर ते 25 ऑक्टाेबरदरम्यान त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यांमधून 33 लाख 80 हजार रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतरही त्यांना धमक्या आणि पैशांची मागणी हाेत राहिली. नारायण यांनी त्यांच्या कुटुंबीयांना या प्रकाराबाबत सांगितले व ही फसवणूक असल्याची बाब तेव्हा समाेर आली. त्यांच्या तक्रारीवरून पाेलिसांनी अज्ञात आराेपींविराेधात गुन्हा दाखल केला आहे.