नागपूर,
Nagpur News वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघ नागपूरची त्रैवार्षिक निवडणूक अध्यापक भवन, गणेशपेठ येथे पार पडली. धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. सौरभ राऊत यांनी लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. एकूण ३९ उमेदवारांपैकी ३७ उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी २१ उमेदवार अविरोध निवडून आले. ८ पदांसाठी प्रत्यक्ष गुप्त मतदान घेण्यात आले. महासंघाचे अध्यक्ष म्हणून मधुकर शेंडे (नागपूर), उपाध्यक्ष प्रमोद मेश्राम, तर युवाध्यक्ष उत्तम शेंडे (कुरखेडा) हे अविरोध निवडले गेले.
सचिव पदावर जितेश मेश्राम (चिमूर), कार्याध्यक्ष माणिक शेंडे (लाखनी) आणि कोषाध्यक्ष केवळराम चौधरी (नागपूर) यांची निवड झाली. निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे तब्बल २७ उमेदवार विजयी झाले असून विरोधी गटातील दोन महिला उमेदवार अविरोध निवडल्या गेल्या. Nagpur News एकूण ४९ मतदारांपैकी २९ मतदारांनी मतदानात सहभाग घेतला. नवीन कार्यकारिणी लवकरच महासंघाच्या कामकाजाला सुरुवात करणार आहे. परिवर्तन पॅनलने ९९ टक्के विजय मिळवून महासंघावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
सौजन्य: उज्वल रोकडे, संपर्क मित्र