वर्धा,
save-democracy सद्यस्थितीत भारतीय लोकशाहीच्या पुढें तिच्या तीनही प्रमुख स्तंभ कायदे मंडळ न्याय पालिका आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्या निष्पक्ष भूमिकेवर संशय निर्माण झाल्यासारखी स्थिती असल्यामुळे लोकशाही धोयात आल्यासारखी आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ शोध पत्रकार निरंजन टकले यांनी केले.
ते प्रा. दिनकरराव मेघे स्मुती व्याख्यानमालेत १८ वे पुष्प गुंफताना बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य डॉ. अंबादास मोहिते, आ. अभिजित वंजारी, अॅड. प्रकाश मेघे, सविता मेघे, डॉ. अभ्युदय मेघेे यांची उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले की, जेव्हा लोकशाही हे स्तंभ आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडत नाही त्या वेळी सरकार जनआंदोलनांवर अनेक बंधने आणून दडपशाही करत असल्याचा आरोप त्यांनी केला.save-democracy डॉ. अंबादास मोहिते यांनी सरकारच्या नवीन जन सुरक्षा विधेयकाला पूर्णतः चुकीचे ठरविले. प्रास्ताविक अंशु मेघे यांनी केले. संचालन पल्लवी पुरोहित यांनी केले तर आभार किरण मेघे यांनी मानले.