पाकिस्तानी चाहत्यांनी 'जन गण मन' गायले; भारताच्या विजेचा अनोखा उत्सव, VIDEO

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,  
pakistani-fans-sing-jana-gana-mana भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव असला तरी, भावना आणि संगीत यांची ताकद नेहमीच सीमांपलीकडे जाते. याचा प्रत्यय सोशल मीडियावर एका व्हिडिओमुळे पुन्हा आला आहे. हा व्हिडिओ पाहून लाखो लोकांच्या डोळ्यांत अश्रू आणि चेहऱ्यावर स्मित उमटलं आहे.
 
pakistani-fans-sing-jana-gana-mana
हा भावनिक प्रसंग भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यादरम्यानचा आहे. सामना सुरू होण्यापूर्वी गायक सुनिधी चौहान भारतीय राष्ट्रगीत "जन गण मन" सादर करत होती. त्याच क्षणी पाकिस्तानातील तीन तरुण चाहते,  दोन मुलगे आणि एक मुलगी आपल्या घरात मोठ्या टीव्हीवर सामना पाहत होते. राष्ट्रगीत वाजताच, या तिघांनी आपोआप उभे राहून हात छातीवर ठेवला आणि संपूर्ण आदराने भारतीय राष्ट्रगीत ऐकलं. pakistani-fans-sing-jana-gana-mana त्यांच्या डोळ्यांत दिसणारा सन्मान आणि मनातील भावनिक अभिव्यक्तीने दोन्ही देशांतील लोकांना थक्क केलं.
हा व्हिडिओ पाकिस्तानमधील अर्शद मुहम्मद यांनी रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केला. काही तासांतच तो व्हायरल झाला आणि ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूबवर लाखो लोकांनी तो शेअर केला. pakistani-fans-sing-jana-gana-mana अनेक भारतीय आणि पाकिस्तानी वापरकर्त्यांनी एकच भावना व्यक्त केली  “सीमा वेगळी असली तरी, आदर आणि भावना या आपल्याला एकत्र आणतात.” हा प्रसंग पुन्हा एकदा दाखवून देतो की, खेळ आणि संगीत यांच्या माध्यमातून मानवता नेहमी राजकारणापेक्षा मोठी ठरते.
 
 सौजन्य : सोशल मीडिया