तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
Rajnikant Borele, पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीतील अपक्ष संचालक तसेच प्रसिद्ध धान्य खरीददार व अडतदार रजनीकांत बोरेले यांनी यंदाच्या सोयाबीन खरेदी हंगामाचा शुभारंभ गोपाल अष्टमीच्या मुहूर्तावर, 30 ऑक्टोबरला रोजी विधीवत पूजा-अर्चना करून केला. ढोल-ताशांच्या गजरात, वैदिक मंत्रोच्चार आणि नारळ फोडून सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करत बोरेले यांनी प्रती क्विंटल 4500 असा दर जाहीर केला. हा दर पांढरकवड्यासह संपूर्ण विदर्भातील इतर मंड्यांपेक्षा जास्त असल्याने हा निर्णय शेतकèयांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
पांढरकवडा बाजार समितीचा अधिकृत शुभारंभ 27 ऑक्टोबरला झाला होता. त्या दिवशी सोयाबीनचे भाव 4060 पासून खाली 800 पर्यंत घसरले होते. मात्र, बोरेले यांच्या खरेदीच्या मुहूर्तावर दर 4500 ते 2000 (मातीरा) पर्यंत राहिल्याने शेतकèयांना समाधानकारक भाव मिळाला. या पार्श्वभूमीवर रजनीकांत बोरेले यांच्या कार्याचे आणि शेतकèयांप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक म्हणून उपस्थित विविध गावातील सर्व शेतकèयांनी त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला. यावेळी बोरेले यांना फुलांचा हार घालून शाल व नारळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राजू बोरेले, शिवम बोरेले, वासुदेव राठोड, बंटी बोरेले, तारकेश्वर चव्हाण, धरमसिंग राठोड, उमेश पंचोली, स्मित झाजरीय, सर्वम रजनीकांत बोरेले प्रमुख्याने उपस्थित होते.
यावेळी व्यापारी नितीन बाजोरिया, प्रमोद भूत, आनंद चोपडा, सुहास कापर्तिवार, महेश आदेवार, गजानन ओसावार, गणेश हटकर, गुंटटू धादोड इत्यादी मान्यवर व्यापारी तसेच बाजार समितीचे सचिव सुरेश खानदनकर उपस्थित होते.या प्रसंगी काही शेतकèयांनी सांगितले की, आम्ही इतर मंड्यांत कमी भावामुळे निराश झालो होतो. पण बोरेले यांनी मुहूर्तावर दिलेला 4500 रू. भाव शेतकèयांसाठी दीपावलीसारखा आनंदाचा क्षण ठरला आहे. यापूर्वी आम्ही हिंगणघाट, यवतमाळ, घाटंजी किवा वणी अश्या मंड्यामध्ये धान्य विकत होतो, असे शेतकèयांनी व्यक्त केले