तभा वृत्तसेवा  यवतमाळ,
Podar International School जयहिंद क्रीडा मंडळ व यवतमाळ जिल्हा मल्लखांब असोसिएशन यवतमाळ व पोदार इंटरनॅशनल स्कूलची मल्लखांबपटू पद्मजा गणेश इंगळे हिची क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत जिल्हास्तर व क्रीडा व युवक उपसंचालक अमरावती यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या विभागस्तर स्पर्धेत पद्मजाने उत्तुंग भरारी घेत राज्यस्तरावर 6, 7 व 8 नोव्हेंबरला लातूरला होणाèया स्पर्धेत स्थान निश्चित केले आहे.
 
 याकरिता पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक प्रफुल चपाते व क्रीडाशिक्षक राजेश कळसकर व विपूल तसेच वर्गशिक्षक आकाश शेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. यवतमाळ जिल्हा असोसिएशन व जयहिंद क्रीडा मंडळामार्फत घेण्यात येत असलेल्या प्रशिक्षणात डॉ. सुभाष डोंगरे व अविनाश भनक व सिद्धार्थ भगत तसेच जयहिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वानखडे यांचे मार्गदर्शनात प्रशिक्षण घेतले व तिने उत्तुंग भरारी पूर्ण केली. त्याकरिता तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तिने असे आवाहन केले की, मला पुढील स्पर्धेसाठी आपले मार्गदर्शन व प्रोत्साहन तसेच आशीर्वाद लाभावे, अशी आशा व्यक्त केली.