जयंत पाटील-गोपीचंद पडळकर यांच्यात पॉलिटिकल वाॅर

जत शहरात साखर कारखाना व डिजिटल फलक वाद पुन्हा तापला

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
सांगली,
Jayant Patil  सांगलीच्या जत शहरात साखर कारखाना आणि त्याभोवती राजकीय वाद पुन्हा तणावपूर्ण स्वरूपात समोर आला आहे. माजी मंत्री व शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील व भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद आता डिजिटल फलकांच्या माध्यमातूनही समोर येत आहे.
अज्ञातांकडून रातोरात जत शहरातील एका महत्त्वाच्या चौकात भव्य डिजिटल फलक लावण्यात आला आहे. या फलकावर “जयंतराव, तेवढा ढापलेला आमचा साखर कारखाना परत द्या बर का?” असे विडंबनात्मक संदेश दिला असून, त्यासोबत जयंत पाटील, विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांचे कार्टूनही तयार करण्यात आले आहेत.
 
 

Jayant Patil 
यापूर्वी गोपीचंद पडळकर यांचे डिजिटल फलक फाडण्याचे प्रकरण कालच जत शहरात घडले होते. या घटनेनंतर जयंत पाटील यांच्या विरोधात असलेले डिजिटल फलक रातोरात शहरात लावण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या नावावर “राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना” असा फलक झळकला होता.यासोबतच पडळकर यांच्या माध्यमातून जत नगरपालिका इमारत, जत पंचायत समिती इमारत तसेच उपप्रादेशिक कार्यालयाच्या नूतनीकरण व विकास कामांसाठी मंजूर झालेल्या निधींच्या माहितीचे डिजिटल पोस्टर शहरात लावले गेले होते. तथापि, अज्ञातांकडून शनिवारी रात्री हे पोस्टर फाडण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ भाजपकडून विजयपूर-गुहागर महामार्गावर रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून Jayant Patil  जत शहरात काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची खेळी सुरु आहे. जयंत पाटील व गोपीचंद पडळकर यांच्यातील संघर्ष आता फक्त शाब्दिक नव्हे तर डिजिटल माध्यमातही स्पष्टपणे दिसून येत आहे.राजकीय तज्ज्ञांच्या मते, या प्रकारामुळे जत शहरात राजकीय वातावरण अधिक तापलेले असून, नागरिकांना शांती राखण्याच्या प्रयत्नांची गरज असल्याचे अधोरेखित केले जात आहे.