१ लाख २६ हजार हेटर क्षेत्रावर होणार रब्बीची पेरणी

चिया व गहू पिकाचे क्षेत्र वाढणार

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
वाशीम,
rabi वाशीम जिल्ह्यातील १ लाख २६ हजार ८६२ हेटरवर रब्बी पिकाच्या पेरणीचे नियोजन कृषी विभागाचे आहे. यंदा पावसाळा चांगला झाला असल्याने गहू व चिया क्षेत्रात वाढ होण्याची शयता आहे. २०२५ -२६ या वर्षात गहू पिकासाठी ४०,३८४ हेटर, रब्बी ज्वारी ११०८ हेटर, मका ९५ हेटर, चिया ४०८५ हेटर, इतर तृणधान्य १८० हेटर , हरभरा ७९,१३३ हेटर, राजमा १०० हेटर , मसूर १०० हेटर , इतर कडधान्य ८८ हेटर , करडई ९३५ हेटर , मोहरी ४३० हेटर , जवस ११५ हेटर , कांदा बीज १०० हेटर, इतर गळीत धान्य ४९ हेटर , असे जवळपास १,२६८६२ हेटर क्षेत्रावर यावर्षी रब्बी पिकाची पेरणी अपेक्षीत आहे. खरीप हंगाम अतिवृष्टीने हातचा गेल्याने रब्बी हंगामात त्याची तुट भरुन काढण्यासाठी शेतकरी रब्बी पिक पेरणीच्या कामाला लागला आहे.
 
 

rabbi pik 
 
 
वाशीम जिल्ह्यात यावर्षी नेहमीच्या रब्बी पिकाबरोबर चिया, राजमा, जवस ही अपारंपारीक व किंमती रब्बी पिकांचे प्रस्तावित क्षेत्र वाढविले गेले आहे. वाशीम जिल्ह्याचा विचार केल्यास २०२४-२५ मध्ये गव्हाचे सरासरी क्षेत्र २५,८२९ एवढे असतांना ३८९८२ हेटर क्षेत्रावर गहू पेरला गेला होता. रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र १२०० हेटर असतांना ८९२ हेटर पेरणी झाली, मका सरासरी क्षेत्र १६७, पेरणी ११८, चिया सरासरी क्षेत्र शुन्य पेरणी ४ हेटर पेक्षा जास्त इतर तृणधान्य सरासरी क्षेत्र २५६ पेरणी २०६, हरभरा सरासरी क्षेत्र ६०,८४४ पेरणी ७७,६९७, राजमा पेरणी १०, मसूर ११३, इतर कडधान्य सरासरी क्षेत्र ६९७ पेरणी ८८, करडई सरासरी क्षेत्र ३९१ पेरणी ७०५, मोहरी पेरणी १५०, जवस पेरणी १५, इतर गळीत धान्य ३८३ पेरणी २५ असे जवळपास १ लाख २३ हजार हेटर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली होती.rabi विशेष म्हणजे सरासरी क्षेत्र ८९,७८१ हेटर एवढे होते. एकंदरीत सरासरी क्षेत्राच्या १३५ टक्के पेरणी मागील वर्षी झाली होती. वाशीम जिल्ह्यातील प्रमुख धरणे जवळपास भरलेली असल्यामुळे त्याचा फायदा शेतकर्‍यांना रब्बी हंगामात होणार आहे. एवढेच नव्हेतर सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे शेतीमध्ये असलेला ओलावा रब्बी हंगामाच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रस्तावित असलेले सरासरी क्षेत्र वाढण्याची शयता असल्याचे बोलले जाते.