बलात्काराच्या गुन्ह्यातील तेलंगणातून फरार आराेपीला अटक

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
rape-accused-arrested-from-telangana तेलंगणा राज्यातील कामरेड्डी जवळच्या मंचरेड्डी पाेलिस हद्दीत महिलेवर लैंगिक अत्याचार करून रेल्वे मार्गाने बिहार येथील मूळ गावी पळून जाणारा फरार आराेपी राहुल कुमारबिलास राम (26) रा. रत्नाहा, भिष्णुपूर, धुसमारी, जिल्हा खगरिया (बिहार) हा अखेर रेल्वे सुरक्षा दलाच्या हाती लागला.
 
 
rape-accused-arrested-from-telangana
 
तेलंगणा पाेलिस आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत हा आराेपी गाेंदीया स्थानकावरून हाती लागला. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीप चंद्र आर्य यांना कामरेड्डी पाेलिस अधीक्षकांकडून माेबाईलवरुन याची माहिती मिळाली हाेती. हा फरार बलात्काराच्या गुन्ह्यातील आराेपी रेल्वेने पळून जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर कामारेड्डी पाेलीस अधीक्षकांनी त्यांना दिला हाेती. त्याचे गांभीर्य लक्षात घेत विभागीय सुरक्षा आयुक्त आर्य यांनी तातडीने हद्दीतील सर्व पाेलिसांना सतर्कतेचा संदेश दिला. rape-accused-arrested-from-telangana आर्य यांनी आधी गाेंदिया हद्दीतून जाणाèया आणि दक्षिणेकडून येणाऱ्या सर्व एक्सप्रेस गाड्यांचे लाेकेशन तपासले. गाडी संबंधित रेल्वे स्थानकावर येताच, तपासणी करण्याचे आदेश रेल्वे पाेलिस दलाला देण्यात आले. रेल्वे सुरक्षा दलाचे गाेंदियातील प्रभारी निरीक्षक पांडे यांनाही त्याचा संदेश पाठवण्यात आला. दरम्यान आराेपी राहूल हा गाेंदिया रेल्वे स्थानकाच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर पडताना दिसला. रेल्वे सुरक्षा दलाचे गाेंदिया पथक आणि तेलंगणा पाेलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत आराेपीच्या गाेंदिया स्टेशनच्या मुख्य गेट परिसरातून त्याला अटक करण्यात आली.