वर्धा,
roadblock बोरगाव मेघे येथील सुपारी माता मंदिर ते सावंगी (मेघे) कडे जाणार्या मुख्य रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. याबाबत जिल्हा परिषदेला निवेदन देऊनही काम सुरू न झाल्याने आज ३ रोजी सामाजिक कार्यकर्त्या अंबिका हिंगमिरे यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. अंबिका हिंगमिरे यांनी रस्त्याच्या नूतनीकरणासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांना भेटून निवेदन देण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांना बोलावून कामाची माहिती घेतली. दिवाळी नंतर काम सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दिवाळी होऊनही काम सुरू न झाल्याने नागरिकांना मोठा त्रास होत असल्याने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी ग्रामविकास अधिकारी गायकवाड यांनी वरिष्ठ अधिकार्यांशी बोलणं करून येत्या आठ दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र आठ दिवसात काम सुरू न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अंबिका हिंगमिरे यांनी दिला.roadblock यावेळी पोलिसांना बंदोबत तैनात करण्यात आला होता. यावेळी सीमा कोटनाके, रुपाली केचे, रुपाली मरापे, सीमा मसराम, विना शेंडे, शालिनी राऊत आशया खान, दीक्षा पाटील, नर्मदा तायडे, वैशाली डोळसकर, गौरी हेले, कुणाल भगत, धीरज सायंकार, वृषिकेश साटोने, उदय कळंबे, कृष्णा सायंकार, रोहन सायंकार, निखिल सहारे, प्रवीण बोटकुले, आमिर दिघोळे, गौरव विरखेडे, यांच्यासह असंख्य महिला तरुण नागरिक उपस्थित होते. गेले चार महिन्यापासून सुपारी माता मंदिर ते सावंगी मेघे रस्त्याच्या कामाचे नूतनीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद कडे पाठपुरावा करीत आहे. मात्र प्रशासन वेळकाढूपाणा करीत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. येत्या आठ दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन मिळाले असल्याचे अंबिका हिंगमिरे यांनी सांगितले.