बागलूर,
maid-kills-dog-in-bengaluru बंगळुरूच्या बागलूर येथील एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये प्राण्यांवरील क्रूरतेचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरकाम करणाऱ्या एका महिलेने लिफ्टमध्ये तिच्या मालकाच्या पाळीव कुत्र्याला ठार मारल्याचा आरोप सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
गूफी नावाच्या या पिल्लाचा ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी क्रूरपणे मृत्यू झाला. आरोपीची ओळख पुष्पलता म्हणून झाली आहे, तिला राशी पुजारी हिने पिल्लाची काळजी घेण्यासाठी कामावर ठेवले होते. कुत्र्याच्या मृत्यूनंतर, पुष्पलता यांनी हिने एक कथा रचली, असा दावा केला की कुत्रा अचानक कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. maid-kills-dog-in-bengaluru तथापि, अपार्टमेंटच्या लिफ्टमधील सीसीटीव्ही फुटेजने धक्कादायक गुन्हा उघडकीस आणला. संशय निर्माण झाला आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये पुष्पलता कुत्र्यावर क्रूरपणे हल्ला करत असल्याचे आणि त्याला लिफ्टच्या मजल्यावर ओढत नेल्याचे दिसून आले.
सौजन्य : सोशल मीडिया
सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, राशी पुजारीची मैत्रीण श्रद्धा गौडा हिने म्हटले आहे की आरोपीने सुरुवातीला गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. "ती गूफीच्या निर्जीव शरीराला ओढत फिरायला परतली आणि तिला अजिबात पश्चात्ताप झाला नाही," गौडा हिने पोस्टमध्ये लिहिले. "तिने माझ्या मैत्रिणीला सांगितले की गूफीचा अचानक मृत्यू झाला, कोणतेही स्पष्ट कारण नसताना. maid-kills-dog-in-bengaluru दुसऱ्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतरच त्यांना पुष्पलताने केलेल्या या घृणास्पद कृत्याबद्दल कळले."