अहमदाबाद,
survivor-of-air-india-crash-still-in-pain १२ जून रोजी अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात २४२ प्रवाशांपैकी एकमेव जिवंत बचावलेला विश्वासकुमार रमेश अजूनही प्रचंड वेदनांनी ग्रस्त आहे. त्या अपघाताने त्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. तो सांगतो, “मी कदाचित सर्वात भाग्यवान माणूस असेन, पण या अपघाताने माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. आजही झोपताना तो क्षण डोळ्यांसमोर येतो.”

त्या दिवशी विश्वासकुमार एआय-१७१ फ्लाइटने लंडनला जाणार होता. मात्र फ्लाइटने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडामुळे विमान अहमदाबादमधील एका मेडिकल हॉस्टेलवर कोसळले. ढिगाऱ्यातून तो स्वतःला बाहेर काढण्यात यशस्वी झाला, पण त्याचा धाकटा भाऊ अजय या दुर्घटनेत मरण पावला. तो विमानाच्या पुढच्या सीटवर बसला होता. “मी एकटाच जिवंत राहिलो. अजूनही विश्वास बसत नाही. हे खरंच चमत्कारासारखं आहे,” अस तो एका मुलाखतीत म्हणाला. भाऊ गमावल्याचे दुःख विश्वासकुमार अजूनही सहन करू शकत नाही. तो म्हणतो, “अजय माझी ताकद होता. प्रत्येक संकटात तो माझ्या पाठीशी होता. आता मी पूर्णपणे एकटा आहे. पत्नीशी आणि मुलाशी बोलणंसुद्धा बंद झालं आहे. survivor-of-air-india-crash-still-in-pain दिवसाचे बहुतेक तास मी माझ्या खोलीत एकटाच बसतो.” अपघातानंतर डॉक्टरांनी त्याला पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) झाल्याचं निदान केलं. मात्र युनायटेड किंग्डमला परत गेल्यानंतर त्याला कोणतेही मानसिक आरोग्य उपचार मिळाले नाहीत. विश्वासकुमार सांगतो, “माझं संपूर्ण कुटुंब अजूनही त्या घटनेतून सावरलेलं नाही. माझी आई रोज दाराशी बसते, कोणाशी बोलत नाही. प्रत्येक दिवस आमच्यासाठी वेदनादायक असतो.”
शारीरिकदृष्ट्याही त्याला अनेक जखमा झाल्या आहेत. विमानाच्या फ्यूजलेजच्या उघड्या भागातून सीट ११A वरून बाहेर पडताना त्याला गंभीर दुखापती झाल्या. तो म्हणतो, “माझे पाय, खांदे, गुडघे आणि पाठ अजूनही दुखतात. चालणंसुद्धा कठीण झालं आहे. सध्या माझी पत्नीच मला उभं राहण्यास मदत करते.” एअर इंडियाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी अपघातातील पीडितांच्या कुटुंबियांशी सातत्याने संपर्कात आहेत. survivor-of-air-india-crash-still-in-pain विश्वासकुमारच्या प्रतिनिधींनाही चर्चेचं निमंत्रण देण्यात आलं होतं, पण कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. एअरलाइनने त्याला £२१,५०० (अंदाजे २५ लाख रुपये) अंतरिम भरपाई दिली आहे, जी त्याने स्वीकारली. मात्र त्याच्या सल्लागारांच्या मते, ही रक्कम त्याच्या उपचार आणि पुनर्वसनाच्या गरजांसाठी अत्यंत अपुरी आहे.