अहेरी,
arrested prohibited tobacco अहेरी पोलिसांनी प्रतिबंधीत सुगंधित तंबाखूच्या वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. आलापल्ली येथे आज, 3 नोव्हेंबरच्या मध्यरात्री पोलिसांनी दोघांना रंगेहात पकडून त्यांच्या ताब्यातून 3 लाख 16 हजार 400 रुपये किमतीचा ‘मजा 108’ बनावट तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरलेली 3 लाख रुपये किमतीची मारुती सेलेरियो कार असा एकूण 6 लाख 16 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शंकर मार्यालु भिमराजुलवार (36) व प्रितम राजेश पेटेवार (30) दोघेही रा. आलापल्ली अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
आरोपी शंकर व प्रितम हे आज पहाटे 2 ते 3 वाजताच्या दरम्यान संगनमत करून महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे प्रतिबंधीत केलेला ‘मजा 108’ सुगंधित तंबाखू अवैधरीत्या वाहतूक करून विक्रीसाठी घेऊन जात होते. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आलापूर-भामरागड रोडवर अंदाजे 7 किमी पूर्व दिशेवर सापळा रचला. यावेळी पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली असता, त्यांना एका पांढर्या रंगाच्या चुंगळीमध्ये सुगंधीत तंबाखूचे एकूण 280 डब्बे आढळून आले. या मालाची किंमत 3 लाख 16 हजार 400 रुपये आहे. यावेळी त्यांच्या ताब्यातील मारुती सेलेरियो कार (क्र. एम.एच 33 ए.4301) जप्त करण्यात आली.
या घटनेत दोघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 123, 274, 276, 277, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.arrested-with-prohibited-tobacco ही कारवाई प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मंगेश यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. महिला पोलिस उपनिरीक्षक दिपाली कांबळे पुढील तपास करीत आहेत. या कारवाईमुळे या भागात पसरणार्या अवैध तंबाखू विक्रीच्या साखळीवर मोठा प्रहार झाल्याचे मानले जात आहे.