मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरेचे निधन

    दिनांक :03-Nov-2025
Total Views |
मुंबई, 
daya-dongre-passes-away मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ आणि बहुमुखी प्रतिभेच्या अभिनेत्री दया डोंगरे हिचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ती ८५ वर्षांच्या होती आणि मागील काही दिवसांपासून आजारी होती. तिच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीसह संपूर्ण कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
daya-dongre-passes-away
 
दया डोंगरे हिने मराठी चित्रपट आणि नाट्यविश्वात आपल्या प्रभावी अभिनयाने एक सुवर्णकाळ गाजवला होता. विशेषत: “कजाग सासू” या भूमिकेसाठी त्या प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या होत्या. त्यांच्या भूमिकांमध्ये विनोद, वास्तव आणि भावनांचा संगम नेहमीच दिसून येत असे. १९४० साली जन्मलेल्या दया डोंगरेला अभिनयाची आवड शालेय जीवनातच निर्माण झाली होती. daya-dongre-passes-away पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी एकांकिका स्पर्धांमधून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून नाट्यकलेचे औपचारिक शिक्षण घेतले.
कलाविश्वाचा वारसा तिला तिच्या घरातूनच लाभला होता. तिची आई यमुताई मोडक या सुप्रसिद्ध नाट्यअभिनेत्री, आत्या शांता मोडक या नामवंत गायिका आणि पणजोबा कीर्तनकार होते. daya-dongre-passes-away या समृद्ध पार्श्वभूमीने दया डोंगरे यांच्या कलात्मक प्रवासाला बळ दिले. लग्नानंतर पती शरद डोंगरेच्या पाठिंब्याने त्यांनी अभिनयाची वाट चालू ठेवली आणि अनेक चित्रपट, नाटके, दूरदर्शन मालिकांमधून आपल्या अभिनयाची अमिट छाप सोडली. तिच्या निधनाने मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांनी एक समर्थ, प्रगल्भ अभिनेत्री गमावली आहे.