नागपूर,
Patanjali Yoga Committee महिला पतंजली योग समिती यांच्या वतीने धंतोली येथील मेजर देव गार्डन येथे भव्य दीपावली मिलन महोत्सव उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन नागपूर जिल्हा प्रभारी आ. माया हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला, संवाद प्रभारी आ. सीमा धांडे, महामंत्री आ. प्रमिला गुड्डे आणि आ. शांति विश्वकर्मा यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात आ. माया हाडे यांनी कार्यक्रमाच्या उद्दिष्टांची माहिती दिली आणि सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. Patanjali Yoga Committee यावेळी उमरेड तहसील प्रभारी आ. संगीता मिश्रा, कामठी येथील आ. लक्ष्मी टिकले, आ. संगीता मेलग, योग विस्तारक आ. चारुलता पाटील, आ. माधुरी ठाकरे, शारदा वराडे, मंगला बावणकर, वनिता मुंगेलवार, मनीषा डुबे, संघटन मंत्री गोकर्ण प्रधान, ममता मुलमुले, भारती रोटे, प्रतिभा वैरागडे, वंदिता मेलग तसेच अनेक योग शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमात आ. मंगला पाटील यांच्या जादूई सादरीकरणाने सर्वांचे मन मोहून टाकले. एकता, आनंद आणि स्नेहाच्या भावनेने दीपावली मिलनाचा उत्सव संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी आ. सीमा धांडे यांनी सर्वांचे आभार मानले.
सौजन्य: भारती रोटे, संपर्क मित्र