अनिल कांबळे
नागपूर,
API Shivaji Laxman Nanavare दुर्मिळ पर्वताराेहण करणाèयांच्या यादीत नागपूर पाेलिसांचे नाव स्वर्ण अक्षरांनी लिहिल्या गेले. चक्क चार शिखरे सर करणाèया सहायक पाेलिस निरीक्षकाच्या नावाची नाेंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड्स 2025’ मध्ये करण्यात आली आहे. शिवाजी लक्ष्मण ननवरे असे त्या पाेलिस अधिकाèयाचे नाव आहे. अशी कामगिरी करणारे ते देशातील एकमेव पाेलिस अधिकारी आहेत.
पाेलिस दलात गडचिराेली येथे कर्तव्य करत असताना त्यांना गिर्याराेहणाची आवड निर्माण झाली. ती त्यांनी पुणे ग्रामीण येथे कर्तव्य करत व्यस्त वेळापत्रकातून कायम ठेवली. या माेहिमेची तयारी करताना त्यांच्या कुटुंबाची आणि वरिष्ठ अधिकाèयांने माेठे सहकार्य केले आहे. सध्या नागपूर पाेलिस दलातील सामाजिक सुरक्षा विभागात सहायक पाेलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले शिवाजी लक्ष्मण ननवरे यांनी जगातील सर्वाेच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (8848.86 मीटर) तसेच मकालू (8485मीटर), मनासलू (8163मीटर ) आणि लाेहसे ( 8516 मीटर) ही सर्वाधिक उंचीची चार शिखरे यशस्वीरीत्या सर केली आहेत. ही चार शिखरे सर करणारे ते देशातील एकमेव पाेलिस अधिकारी आहेत. या उल्लेखनीय आणि दुर्मीळ पर्वताराेहण कामगिरीबद्दल त्यांची नाेंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड्स 2025’ मध्ये करण्यात आली आहे. शिखरावर चढाई करताना अनेकदा अचानक हवामान बिघडले हाेते. मात्र, मनाेबल ढळू न देता या बिकट परिस्थितीचा सामना करीत त्यांनी यश अक्षरशः खेचून आणले. या माेहिमेच्या निमित्ताने अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य केले त्या सर्वांचे ननवरे यांनी आभार मानले आहेत. या कामगिरीबद्दल नागपूर शहर पाेलिस आयुक्त डाॅ. रवींद्र कुमार सिंगल , पाेलिस सहआयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पाेलिस आयुक्त रवींद्रसिंग परदेशी, पाेलिस उपायुक्त राहुल माकणीकर, सहाय्यक पाेलिस आयुक्त डाॅ. अभिजीत पाटील आणि सामाजिक सुरक्षा विभागाचे पाेलिस निरीक्षक राहुल शिरे यांनी एपीआय ननवरे यांचा विशेष सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले. ननवरे यांच्या या यशामुळे महाराष्ट्र पाेलिस दल आणि नागपूर पाेलिसांचे नाव भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळले आहे.
माउंट एव्हरेस्टबद्दल थाेडक्यात माहिती
पृथ्वीवरील सगळ्यात उंच ठिकाण म्हणजे माऊंट एव्हरेस्ट हाेय. माउंट एव्हरेस्ट हे हिमालय पर्वत रांगेतील एक उंच आणि उतुंग शिखर आहे. जगभरातील कुठल्याही गिर्याराेहकाचे एव्हरेस्ट सर करणे, हे स्वप्न असते. हे चीनच्या स्वायत्त प्रदेश नेपाळ आणि तिबेट यांच्या मध्यभागी 8 हजार 848 मीटर म्हणजेच 29 हजार 032 ुटांवर आहे. जगातील सगळ्याच गिर्याराेहकांचे स्वप्न राहिलेल्या माऊंट एव्हरेस्टचं नाव हे राॅयल जिऑग्रािफकल साेसायटीने सर जाॅर्ज एव्हरेस्ट यांच्या स्मरणार्थ दिलेले आहे. ऑक्सिजनची कमतरता या ठिकाणी असते, हवामान देखील अचानक बिघडते. यामुळे एव्हरेस्टची चढाई करणे सर्वात धाेकादायक असते.