वर्धा,
Wardha farmers aid, नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात जुन ते सप्टेबर या कालावधीत शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यातील अशा २ लाख ५६ हजार शेतकर्यांना मदत वितरणासाठी २२६ कोटी ९२ लाख रुपये प्राप्त झाले आहे. त्यापैकी १ लाख २७ हजार शेतकर्यांच्या खात्यात १२२ कोटी २६ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले.
जिल्ह्यात जुन, जुलै या कालावधीत अतिवृष्टी, पुरपरिस्थितीमुळे ३ हजार ६७९ शेतकर्यांचे २ हजार ७४४ हेटर पिकांचे निकसान झाले होते. यासाठी २ कोटी ३३ लाख ५७ हजार इतका निधी प्राप्त झाला. यापैकी ३ हजार ६९ शेतकर्यांना २ कोटी ७ लाख ७५ हजार निधी वितरीत करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात ९ हजार ३८३ शेतकर्यांच्या ६ हजार ५९४ हेटर पिकांचे नुकसान झाले. यासाठी ५ कोटी ६० लाख ९० हजार प्राप्त झाले असून त्यापैकी ७ हजार ३९५ शेतकर्यांना ४ कोटी ७५ लाख ११ हजाराचे वितरण करण्यात आले आहे.
सप्टेंबर महिन्यात तब्बल २ लाख ४३ हजार १९८ शेतकर्यांच्या २ लाख ७२ हजार ९७२ हेटरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यासाठी २१८ कोटी ९७ लाख ९७ हजार निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत १ लाख १७ हजार १३२ शेतकर्यांच्या खात्यात ११५ कोटी ४३ लाख ९६ हजार इतका निधी जमा करण्यात आला आहे. याप्रमाणे जुन ते सप्टेंबर या कालावधीत नुकसानग्रस्त १ लाख २७ हजार ५९६ शेतकर्यांच्या खात्यात आतापर्यंत १२२ कोटी २६ लाख ८४ हजार जमा करण्यात आले आहे. वीज पडून, पुरात वाहून गेल्याने जिल्ह्यात मृत्यू झालेल्या १० व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाखाप्रमाणे ४० लाख रुपयांची मदत वाटप करण्यात आली आहे. वीज पडून जखमी झालेल्या आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ९ जणांंना ८० हजार ४०० रुपयांची मदत वाटप करण्यात आली आहे.
वीज पडून, पुरात वाहून ७४ लहान व मोठे जनावरे मृत पावली. या जनावर मालकांना १३ लाख ४ हजार मदत वाटप करण्यात आली आहे. अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे घरात पाणी शिरुन नुकसान झालेल्या व्यक्तींना प्रतिकुटुंब १० हजार याप्रमाणे १८८ कुटुंबांना ११ लाख ८० हजार इतया मदतीचे वाटप करण्यात आले आहे. अंशत: व पुर्णत: नुकसान झालेल्या ७५७ घरे व ४४ गोठ्यांच्या नुकसानीसाठी ४० लाख ४३ हजार अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी कळविले आहे.