हिंगणघाट,
Sindhi community छत्तीसगड प्रादेशिक जोहर पक्षाचे अध्यक्ष अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे दैवत झुलेलाल यांच्याबद्दल अपमानास्पद वतव्य केल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन सकल सिंधी समाजाच्या वतीने भारतीय सिंधू सभा हिंगणघाट शाखेच्या वतीने आज ४ रोजी उपविभागीय अधिकारी आकाश अवतारे यांना देण्यात आले.
माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, अध्यक्ष किशन नेभनानी, पत्रकार सोनू आर्य, प्रल्हाद मोटवानी यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्या प्रमाणे, २६ ऑटोबर रोजी छत्तीसगडमधील रायपूर येथे पत्रकार परिषदेत अमित बघेल यांनी हेतुपुरस्सर सिंधी समुदायाच्या भावनांचा अपमान केला आणि सिंधी समुदायाविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केली. त्यामुळे सिंदी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. बघेल यांनी सिंधी समाजाची जाहीर माफी मागावी तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करून बघेल यांच्या वतव्याचा निषेध करण्यात आला.
निवेदन देताना भारतीय सिंधूसभेचे सदस्य व सिंधी समाजाचे विनोद उदासी, संजय बुलानी, पवन सचवानी, अशोक बोधानी, राजेश लखानी, तीरथदास मोटवानी, हिरानंद मोटवानी, दिलीप रहेजा, विक्की तकतानी, सुनील अमलानी, राजेश चंदानी, राजू मिहानी तसेच सिंधी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.