कृषी समृद्धी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
यवतमाळ,
krishi-samruddhi-yojana :  कृषी समृद्धी योजनेअंतर्गत 2025-26 या वर्षाकरिता इच्छुक शेतकरी गट तसेच शेतमाल उत्पादक कंपन्यांकडून 6 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात विविध कृषी क्षेत्रातील योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
 

 KL 
 
त्यामध्ये तीळ, चिया, रबी ज्वारी, भुईमूग या पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढ योजना, औषधी वनस्पती व स्ट्रॉबेरी लागवड क्षेत्र वाढ योजना, हिरवळीचे पिक लागवड, बायोचार युनिट, माती परीक्षण प्रयोगशाळा, जीवामृत स्लरी टँक, किसान ड्रोन योजना, बांधावरील जैविक प्रयोगशाळा, शुगरकेन हार्वेस्टर, गोडावून व थ्रेशिंग यार्ड बांधकाम, क्लिनिंग ग्रेडिंग युनिट, मोहफूल संकलन जाळी संच, हळद प्रक्रिया रोपण यंत्र, कापणी यंत्र, उकळणी भट्टी पॉलिशिंग यंत्र तसेच कडूनिंब (ढेप, पावडर, तेल) प्रक्रिया युनिट अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी शेतकèयांनी आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.