सीसीटीव्हीत कैद भयावह क्षण...तरुणीवर झाडल्या धडाधड गोळ्या

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
फरिदाबाद,
Bullets fired at the young woman हरियाणातील फरिदाबाद शहरात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. श्याम कॉलनी भागात एका तरुणाने केवळ १७ वर्षीय कनिष्क नावाच्या मुलीवर दिवसाढवळ्या गोळीबार केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. गोळीबारानंतर आरोपी मोटारसायकलवरून फरार झाला.
 
 
Bullets fired at the young woman
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिष्क ही आपल्या मित्रासह लायब्ररीतून घरी परतत असताना आरोपीने अचानक तिच्यावर जवळून गोळी झाडली. एक गोळी तिच्या खांद्यावर आणि दुसरी पोटात लागल्याने ती गंभीर जखमी झाली. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी काही वेळ गल्लीच्या कोपऱ्यात थांबलेला आणि मुलगी जवळ येताच पिस्तुल काढून गोळीबार करताना दिसतो. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.
 
 
 
फरिदाबाद पोलिसांचे प्रवक्ते यांनी सांगितले की, आरोपी मुलीचा परिचित असून तो तिच्यासोबत एका कोचिंग क्लासमध्ये शिकत होता. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक तपासानुसार वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवून चार विशेष पथके तयार केली आहेत. गुन्ह्यात वापरलेले शस्त्र घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आहे. पोलिस अधिकारी म्हणाले, घटनेची माहिती मिळताच आम्ही मुलीला रुग्णालयात दाखल केले. तिचा जबाब नोंदवला असून आरोपीचा शोध तीव्र करण्यात आला आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल. या घटनेनंतर नागरिकांमध्ये रोष पसरला असून, दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्याने परिसरातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.