हिंगणघाट,
bus-stand-in-hinganghat बस स्थानकावर येणार्या बसेस उभ्या राहण्यासाठी यापूर्वी फत पाच फलाट होते. त्यामुळे बसेस उभ्या करताना जागेची गैरसोय होत होती. पर्यायाने प्रवाशांचीसुद्धा गैरसोय होत होती. आता ५ कोटीच्या नवनिर्मित बस स्थानकात १० फलाटाचे निर्माण होणार असून सगळ्यांसाठीच चांगल्या सुविधा असणार असल्याचे आ. समिर कुणावार म्हणाले.

हिंगणघाट बस स्थानक भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आ. कुणावार बोलत होते. यावेळी माजी खासदार रामदास तडस, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, राज्य परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे, कार्यकारी अभियंता शितल गौंड, यंत्र अभियंता वर्धा विभाग प्रतापसिंग राठोड, किशोर आदमने, ठाणेदार अनिल राऊत, सुधीर गुल्हाने आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, हिंगणघाट बस स्थानकात १६ नवीन बसेस आलेल्या असून अजून १० बसेस येणार असल्याची माहिती देतानाच ग्रामीण भागासाठी असणार्या वेळापत्रकावर लक्ष देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. bus-stand-in-hinganghat त्यांनी ठरल्यावेळी बसेस सोडण्याची सूचनावजा निर्देश दिले. संचालन नितीन सुकळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन बस स्थानक प्रभारी श्री. सडमाके यांनी केले.