नागपूर,
Railway Colony Omkar Nagar सेन्ट्रल रेल्वे कॉलनी, ओंकार नगर येथे दुर्वांकुर शारदोत्सव मंडळाच्या १४व्या वर्षातील पाच दिवसीय शारदा उत्सवाची सुरुवात झाली आहे. भजन, सुगम संगीत, सप्तशती पाठ, गायत्री यज्ञ असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
 
या उत्सवानिमित्त रविवार, २ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. Railway Colony Omkar Nagarडॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या डॉक्टर व सहायकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शिबिरात २६ नागरिकांनी रक्तदान केले. आयोजकांनी नागरिकांना पुढील कार्यक्रमातही उत्स्फूर्त सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
 
सौजन्य:मिलिंद शिनखेडे,संपर्क मित्र