दारव्हा नगर परिषद कारभाराविरोधात मनसेचा संताप

नप कर बिलांची होळी करून निषेध

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
Darvha Municipal Council : दारव्हा शहरातील वाढता कर, भ्रष्टाचार आणि नागरिकांना भेडसावणाèया मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी आज गोळीबार चौकात जोरदार आंदोलन केले. नगर परिषदेकडून आलेल्या वाढीव कर बिलांची प्रत्यक्ष होळी करून मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदविला.
 
 
KL;
 
शहरातील असमतोल पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, नाल्यांच्या सफाईतील निष्काळजीपणा आणि नागरिकांवरील अन्यायकारक करवसुली या सर्व विषयांवर मनसे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. जनतेच्या पैशावर चालणारा भ्रष्टाचार थांबवला पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन होईल, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.
 
 
या आंदोलनादरम्यान गोळीबार चौक परिसर घोषणांनी दणाणला. दारव्हा नगर परिषद हाय हाय, भ्रष्टाचारमुक्त दारव्हा हवे, कर भरला पण सेवा कुठे, अशा घोषणांनी नागरिकांनीही मनसेसोबत आवाज उठवला. मनसे नेते दिनेश सुकोडे यांच्या नेतृत्वात या आंदोलनात तालुकाध्यक्ष लाला पांडे, कामगार आघाडीचे रणजित झोंबडे, माजी तालुकाध्यक्ष ईश्वर राठोड, प्रथमेश उरकुडे, हरीभाऊ मापरे, शहराध्यक्ष राम गायकवाड, शहर उपाध्यक्ष प्रतीक फेंडर यांच्यासह सौरभ चौधरी, अर्पित राऊत, ललित शेलोकर, शुभम शेलोकर, ओम तंदुलकर, महेश देशकरी, गणेश आस्वार, अनिकेत दळवी, राजू इंगोले, विलास वाघमारे, प्रमोद सावळे, गुड्डू वदरकर, रवी शेंडे, अक्षय घरात, अक्षय गुरडकर, राजू खाडे, राजू वाडस्वार व कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांच्या मागण्यांवर तातडीने ठोस उपाययोजना करा, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे पदाधिकाèयांनी प्रशासनाला इशारा दिला.