तभा वृत्तसेवा
दारव्हा,
darwha municipal tax hike issue, सध्या दारव्ह्यात नप कार्यालयाच्या वतीने वाढीव कर मूल्यांकन नोटीसा पाठविण्यात आल्या असुन झालेली करवाढ बघता शहरात व नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. करवाढीच्या संदर्भामध्ये नागरीकांनमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या अनुषंगाने नगर पालीका करवाढी संदर्भात समाधानकारक तोडगा काढण्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे आश्वासन सेना पदाधिकाèयांनी घेतले
दारव्हा नगर परिषदेने चतुर्थ वार्षिक कर मुल्यांकन केले असून त्याबाबत नागरिकांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. नागरिकांवर लादण्यात आलेले विविध कर तातडीने मागे घेण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. आम्ही तालुका शिवसेना व शहर शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी प्रस्तावित करवाढी संदर्भात
नागरिकांच्या मताशी सहमत आहोत. त्यामुळे आम्ही सर्व तालुका सेना व शहर शिवसेना पदाधिकारी यांनी ही बाब पालकमंत्री संजय राठोड यांचेकडे मांडली. पालिकेने कर मुल्यांकन करून नोटीस पाठविल्या, ही नोटीस हातात पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात करवाढ झाल्याचे लक्षात आल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. कर योग्य मुल्यांवर 20 टक्के कर आकारणी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे नागरिकांची मागणी म्हणून सदर कर वाढिला स्थगिती द्यावी, अशी एकमुखी मागणी तालुका व शहर पदाधिकाèयांनी केली. यावर पालकमंत्री संजय राठोड यांनी करवाढीसंदर्भात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आजच भेट घेत सदर करवाढीचा विषय त्यांचेकडे मांडतो. निश्चितपणे करवाढी संदर्भात समाधानकारक तोडगा काढल्या जाईल असे आश्वासन आम्हा तालुका व शहर शिवसेना पदाधिकाèयांना दिले.
ही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी जिल्हा प्रमुख यशवंत पवार, तालुकाप्रमुख मनोज सिंगी, शहर प्रमुख राजू दुधे, विधानसभा संघटक किशोर राठोड, उपशहर प्रमुख आनंद झोळ, अंबादास इंगोले, धनंजय इरवे, रामेश्वर गावंडे, परशराम राठोड, महेश भेंडे, विभागप्रमुख मुरली गायकवाड, आशिष डोंगरे, विवेक जाधव, वैभव निमकर, विभागप्रमुख दीपक नाईन, केदार दाढे, करण राठोड, चेतन सागर, अमोल वानखडे, श्याम मोहतुरे, देविदास वाघाडे, प्रकाश दुधे, हेमंत गुल्हाने, विनोद जाधव, संदीप राठोड उपस्थित होते.