चामोर्शी,
Dialogue by A. Narote तालुक्यातील मोहर्ली मोकासा या गावाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला व गावातील क्रीडांगण, वाचनालयाची गरज, पिण्याच्या पाण्याची अडचण तसेच शेतकर्यांच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान याबाबत चर्चा केली. ग्रामविकासासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला.

यावेळी चामोर्शी तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे, भाजपा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, सरपंच सुधीर शिवणकर, तालुका महामंत्री माणिक कोहळे, विष्णू ढाली, शेषराव कोहळे, आदिवासी मोर्चा जिल्हा महामंत्री रेवनाथ कुसराम, भाविक आभारे, माजी उपसरपंच उर्मिला ढिवरू मडावी व अन्य गावकरी उपस्थित होते. आमदार डॉ. नरोटे यांनी ग्रामपंचायत फराडा येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. गावातील वीजपुरवठा आणि इतर स्थानिक समस्यांबाबत नागरिकांकडून माहिती घेतली व संबंधित अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच अलीकडील पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून शेतकर्यांशी संवाद साधला. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शासन स्तरावर योग्य मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन आमदारांनी दिले.