ईडीची नागालॅण्डमध्ये छापेमारी!

मानवी केसांची निर्यात प्रकरण

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली, 
ed-raids-nagaland : मानवी केसांच्या निर्यातीच्या नावाखाली झालेल्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहाराच्या चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने मंगळवारी नागालॅण्ड, आसाम आणि तामिळनाडूमध्ये एकाच वेळी छापेमारी केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई ईडीच्या दिमापूर कार्यालयाने केली.
 
 
ed
 
 
 
विदेशी चलन व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदींनुसार दिमापूर आणि गुवाहाटीमधील प्रत्येकी दोन आणि चेन्नईमधील तीन परिसरांची झडती घेण्यात आली. ईडीच्या नागालॅण्ड कार्यालयाने सदर कायद्यांतर्गत केलेली ही पहिलीच कारवाई आहे, असे अधिकाèयांनी सांगितले. हा तपास लिमा इमसोंग आणि त्याच्याशी संबंध असलेल्या व्यक्तींशी संबंधित आहे.
 
 
लिमा इमसोंगच्या एकट्याच्या मालकीची असलेली इमसोंग सप्लायर्स नावाची कंपनी मानवी केसांच्या निर्यातीच्या बहाण्याने परकीय चलन मिळवत होती. ही कृती दिमापूरमध्ये असामान्य आणि व्यावसायिकदृष्ट्या अव्यवहार्य आहे. सदर संस्थेने शिपिंग बिल, निर्यात इनव्हॉइस प्रती यासारख्या आवश्यक निर्यात कागदपत्रे विहित वेळेत अधिकृत डीलर बँकेला सादर केली नाहीत.
 
 
निर्यात दायित्वांची अशा प्रकारे पूर्तता न करणे आणि कागदोपत्री पुरावे दडपणे हे फेमा आणि आरबीआयच्या निर्देशांचे उल्लंघन आहे, असे ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले. इमसॉन्ग ग्लोबल या बँक खात्यात मिळालेले विदेशी पैसे इंचेमइंडिया प्रा. लि. नावाच्या संस्थेकडे आणि लिमा इमसॉन्ग आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैयक्तिक खात्यांमध्ये वळवले गेले असल्याचे चौकशीत असे आढळले.