फरीदाबाद गोळीबार : लायब्ररीतून सुरू झाले वेडे प्रेम, दोन दिवसाआधी मागितली माफी...

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
फरीदाबाद, 
faridabad-shooting फरीदाबाद शहरात दिवसाढवळ्या एका १७ वर्षीय मुलीवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. ही मुलगी जेईई परीक्षेची तयारी करत असताना, तिचा पाठलाग करणाऱ्या तरुणाने अचानक गोळी झाडून जीव घेण्याचा प्रयत्न केला. आरोपीची ओळख २० वर्षीय जतिन मंगला अशी झाली असून तो गुरुग्रामच्या सोहना परिसरातील रहिवासी आहे.
 
faridabad-shooting
 
सोमवारी दुपारी श्याम कॉलनी परिसरात कनिष्का नावाच्या मुलीवर आरोपी जतिनने जवळून गोळी झाडली. गोळी तिच्या खांद्यावर आणि पोटात लागली. सध्या ती सेक्टर ८ येथील रुग्णालयात उपचार घेत आहे आणि तिची प्रकृती स्थिर आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते की आरोपी रस्त्याच्या कडेला थांबलेला असतो, मुलगी जवळ आली की तो सरळ तिच्याकडे धाव घेत गोळी झाडतो आणि ताबडतोब बाइकवरून पळ काढतो. घटनेनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी चार विशेष पथके स्थापन केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिष्का भगतसिंग कॉलनीत राहते आणि ती ओपन एज्युकेशन बोर्डातून बारावीचे शिक्षण घेत आहे. जतिन मंगला तिला मागील काही महिन्यांपासून त्रास देत होता. faridabad-shooting दोघांची ओळख एका खासगी लायब्ररीत झाली होती, जिथे ते दोघे अभ्यासासाठी येत असत. लायब्ररी व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार, जतिनने सहा महिन्यांपूर्वी प्रवेश घेतला होता, पण कनिष्का तेथे एक वर्षापासून येत होती. जतिन तिचा पाठलाग करीत राहिल्याने केवळ १५ दिवसांतच त्याचे सभासदत्व रद्द करण्यात आले. कनिष्कालाही त्या त्रासामुळे काही काळ लायब्ररीत येणे बंद करावे लागले.
सौजन्य : सोशल मीडिया 
पाच महिन्यांपूर्वी कनिष्काने पुन्हा लायब्ररीत प्रवेश घेतला, मात्र जतिनला थांबवण्यात आले. तरीही त्याने तिचा पाठलाग थांबवला नाही. दोन दिवसांपूर्वीच त्याने कनिष्काच्या कुटुंबासमोर माफी मागितली होती, पण अखेर सोमवारी त्याने रागाच्या भरात गोळीबार केला आणि पळ काढला. faridabad-shooting फरीदाबाद पोलिसांनी आरोपीचा शोध तीव्र केला असून, लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल, अशी माहिती डीसीपी कार्यालयातून देण्यात आली आहे.