नाकाबंदी करून दारूसह १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

*शहर पोलिसांची कारवाई

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
liquor-seized शहरातील बेकायदेशीर दारू पुरवठा तसेच विक्रेत्यांना आवर घालण्यासाठी शहर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. परीक्षाविधीन पोलिस उपनिरीक्षक विशाल सवाई यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे समतानगर परिसरात नाकाबंदी केली. दरम्यान, संशयित वाहन दिसताच वाहनाला थांबवून झडती घेतली असता दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी या कारवाईत १६ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
 

liquor-seized
 
पोलिस उपनिरीक्षक विशाल सवाई यांना एम. एच. ३६ झेड. ५९९९ क्रमांकाच्या पांढर्‍या रंगाच्या कारमधून देशी-विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे सवाई गस्तीवर असलेल्या पथकासह समतानगर परिसरात नाकाबंदी केली. यादरम्यान एक पांढर्‍या रंगाची संशयित कार दिसताच पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला. मात्र, पोलिसांना बघताच कार चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कारचा पाठलाग करून शोध घेतला. चालकाने कार सोडून पळ काढल्याचे लक्षात आले. कारची तपासणी केली असता खर्ड्याच्या ५१ खोयांमध्ये देशी-विदेशी दारू आढळून आली. आरोपी मोनू विश्वकर्मा व सौरव भगत हे असल्याची माहिती समोर आली असून हे दोघे वर्धा परिसरात मोठ्या प्रमाणात दारूची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. liquor-seized ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विशाल सवाई, शैलेश चाफलेकर, प्रशांत वंजारी, पवन लव्हाळे, श्रावण पवार, रंजित बुरशे, शिवा डोईफोडे, नंदकिशोर धुर्वे, अभिषेक मते आदींनी केली.