बंगळुरू, 
bengaluru-doctor-murder-case बंगळुरूतील सुप्रसिद्ध डॉक्टर महेंद्र रेड्डी जी.एस. यानी पत्नी डॉ. कृतिका एम. रेड्डीच्या खुनानंतर काही महिन्यांतच अर्धा डझन महिलांशी संपर्क साधल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिस तपासात उघड झाले आहे की, रेड्डीने या महिलांपैकी एका महिलेपुढे कबूल केले होते की त्याने स्वतःच्या पत्नीचा खून केला आहे.
 
 
  
कृतिकाच्या शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवालात तिच्या शरीरात भूल देणाऱ्या औषधांचे अंश आढळले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता, महेंद्र रेड्डीने लग्नाच्या हेतूने अनेक महिलांना मेसेज पाठवले असल्याचे समोर आले. वृत्तानुसार, रेड्डीने किमान ४ ते ५ महिलांशी संपर्क साधला होता. त्यापैकी एक महिला वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित होती. आश्चर्य म्हणजे, या महिलांपैकी एकीला त्याने फोनपे अॅपवरून मेसेज पाठवला; "मी तुझ्यासाठी माझ्या पत्नीला मारले आहे." महिलेने त्याला आधीच सर्व सोशल मीडियावर ब्लॉक केले होते, त्यामुळे रेड्डीने आर्थिक अॅपवरून मेसेज पाठवला. पोलिसांनी सांगितले की, या महिला डॉक्टरच्या संपर्कात दुसऱ्या लग्नाच्या प्रयत्नात आल्या होत्या. २४ एप्रिल २०२५ रोजी रेड्डीने पत्नी कृतिकाला  भूल देणारी औषधे देऊन तिचा खून केला होता. bengaluru-doctor-murder-case १४ ऑक्टोबरला पोलिसांनी त्याला उडुपी जिल्ह्यातून अटक केली. त्याच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये महिलांना पाठवलेले मेसेजेस आढळले.
डीसीपी परशुराम यांनी सांगितले की, हे मेसेज फोनपेद्वारे पाठवले गेले होते आणि संबंधित महिलांचे जबाब नोंदवले आहेत. त्या महिलेने पोलिसांना सांगितले की, तिला वाटले की रेड्डी फक्त लक्ष वेधण्यासाठी खोटे बोलत आहे, पण या गुन्ह्यात तिचा काहीही संबंध नाही. तपासात हेही उघड झाले की २०२३ पर्यंत रेड्डी मुंबईतील एका महिलेशी संपर्कात होता. bengaluru-doctor-murder-case त्याने तिच्यासमोरही विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता. पण नंतर त्याने तिच्या वडिलांना फोन करून “रेड्डीचा मृत्यू झाला आहे” असे सांगितले. काही महिन्यांनी रेड्डी स्वतः त्या महिलेशी पुन्हा संपर्कात आला आणि म्हणाला, “माझ्या कुंडलीनुसार माझी पहिली पत्नी मरणार होती, आता ती गेली आहे, आता मी तुला लग्न करू इच्छितो.” या संपूर्ण प्रकरणानंतर बंगळुरू पोलिसांनी रेड्डीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. कृतिकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, लग्नानंतर महेंद्रने सतत पैशासाठी दबाव टाकत मुलीला छळले. शेवटी भूल देऊन तिचा जीव घेतला. ही घटना केवळ वैवाहिक हिंसेचे नाही, तर मानसिक विकृती आणि स्त्रीविरोधी प्रवृत्तीचे भयावह उदाहरण ठरली आहे.