आर्वी,
Kartiki Bhathibhav विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र कौंडण्यपूर हे पुन्हा एकदा कार्तिकी भतिभावाने नटणार आहे. कार्तिक प्रतिपदेला दहीहांडीच्या दिवशी होणार्या या पारंपरिक यात्रेत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी हजारो वारकरी दिंड्या, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि हरिनामाचा गजर याने संपूर्ण नगरी दुमदुमणार आहे. यंदा या यात्रेत स्व. वामनराव दिवे स्मृती प्रित्यर्थ वारकर्यांच्या स्वागताचा आणि महाप्रसादाचा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कौडण्यापूर येथील संत सदाराम महाराज हे दरवर्षी पंढरपूर येथील आषाढी व कार्तिकी एकादशी निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनाला जायचे. परंतु, वृद्धापकाळामुळे त्यांना पंढरपूरची वारी करणे अशय झाले होते. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने मीच कौडण्यापूर येथील कार्तिक पौर्णिमेला व प्रतिपदेला येतो, असे त्यांना सांगितले, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेला व प्रतिपदेला प्रत्यक्ष विठ्ठलाला निवास हा कौडण्यापूर येथे असतो, अशी भतांची धारणा आहे.
गुरुवार ६ रोजी पहाटे ५ ते ७ वाजेपर्यंत मुकामी भतांना चहाचे वितरण, सकाळी ८ ते १० दरम्यान दिंडीत सहभागी वारकर्यांचा शॉल, श्रीफळ देऊन सत्कार तसेच सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सोयीसाठी बुधवार ५ नोव्हेंबर रोजी मुकामाची सोय करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला संत आचार्य जितेंद्रनाथ महाराज (देवनाथ मठ, अंजनगाव सुर्जी) तसेच संत सचिन देव महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
श्री संत अच्युत महाराजांची तपोभूमी असलेले शिवभवन हे यात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. येथे भूमिगत तीन शिवलिंग, प्राचीन शिवपंचायतन आणि संतांच्या अध्यात्मसाधनेचे साक्षीदार असे हे स्थळ भतांच्या मनात अत्यंत पावन मानले जाते. रुमिणीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध कौंडण्यपूर हे पुराणकालीन नगर भती, श्रद्धा आणि इतिहास यांचा संगम आहे. भगवान श्रीकृष्णाने याच नगरातील अंबिका मातेसमोरून रुमिणीचे हरण केले, अशी पुराणकथा आहे. या भूमीवर दमयंती, शबरी, इंदुमती यांसारख्या महान स्त्रीपात्रांची जन्मभूमी असल्याचा उल्लेखही धर्मग्रंथांत आहे.
वारकर्यांचा उत्साह, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि हरिनामाचा गजर यामुळे यात्रेच्या दिवशी कौंडण्यपूर भतिभावाने उजळून निघणार आहे. या श्रद्धामहोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक सुधीर दिवे यांनी केले आहे.