लहानुजी महाराज देवस्थानात सामुहिक तुळशी विवाह

तभाच्या प्रेरणेतून पुढाकार : डॉ. सतीश ठाकरे

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
आर्वी,
Lahanuji Maharaj, संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेड येथे सोमवार ३ रोजी सांयकाळी तरुण भारतच्या संकल्पनेतील सामुहिक तुलसी विवाह मोठ्या थाटामाटात व आनंदात शेकडो ग्रामस्थ व लहानुभताच्या उपस्थितीत संपन्न झाला.
 
 

Lahanuji Maharaj, 
पौरोहित्य संस्थानाची पुजारी नांदणे महाराज व नितीन महाराज यांनी केले. अभ्यासिकेचा विद्यार्थ्यांनी संपूर्ण सजावट, आकर्षक विद्युत रोषनाई करून फटायांची आतषबाजी केली.तुळसी विवाहाचे आध्यात्मिक महत्त्व व पर्यावरणीय संदेश विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे सांगितले. नैसर्गिक प्रकोपामुळे बळीराजा हतबल झाल मुल मुलींचे लग्न करण्यास असमर्थ आहेत. त्या पृष्ठभूमीवर सामूहिक विवाहाची गरज व्यत केली. सामुहिक तुळशी विवाहाची सुरवात करूर हि सामाजिक परिवर्तनाचे पाऊल टाकण्याची प्रेरणा तरुण भारतच्या माध्यमातून समाजापर्यन्त पोहोचविण्याची सुरवात संस्थानने केली असल्याचे लहानुजी महाराज संस्थानचे संचालक डॉ. सतीश ठाकरे म्हणाले.
सामुहिक तुळशी विवाहाचे आध्यात्मिक पर्यावरणविषयक व सामाजिक महत्त्व सोहळ्याच्या माध्यमातून समाजात प्रसारित करुन कालसापेक्ष बदलाची जाणिव करून देण्यात आली. यावेळी बबलू देशमुख, विठ्ठल भालतडक, विनोद डोळस, वसंत बायस्कर, गजानन भुजाडे, स्वप्नील जामखुटे, राहुल जामखुटे, नंदू देशमुख, नितीन हरने, राहुल नेवारे, रजत उईके, नितीन ढवळी, रजनी कडू, सुरेश ठवळी, परिक्षित कडू, अमोल जवळेकर सोपान भालतडक, संजय देशमुख, शरद पेठे, अरविंद मेश्राम, विनोद डोळस, आशिष मानकर, धनंजय पाटील, अभ्यासिकेचे विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. तुळशी विवाहानंतर दिवाळी फराळ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. समर्थांच्या पालखीने गाव प्रदक्षिणा काढण्यात आली