मोठी बातमी : बिलासपूरमध्ये लोकल ट्रेन आणि मालगाडीची धडक, अनेकांच्या मृत्यूची भीती

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
बिलासपूर, 
local-train-and-goods-train-collide-in-bilaspur छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात लालखदान परिसरात सोमवारी दुपारी भीषण रेल्वे अपघात घडला. हावडा मार्गावर धावणाऱ्या प्रवासी मेमू गाडीची मालगाडीशी समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अधिकाऱ्यांनी अजून मृतांचा आकडा अधिकृतरीत्या जाहीर केलेला नाही.
 
local-train-and-goods-train-collide-in-bilaspur
 
अपघात बिलासपूर स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर झाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, मेमू ट्रेन हावड्याकडे जात असताना समोरून येणाऱ्या मालगाडीशी तिची भीषण टक्कर झाली. धडकेचा आवाज एवढा जबरदस्त होता की आसपासच्या परिसरात घबराट पसरली. प्रवासी गाडीचे पुढचे डबे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, तर मालगाडीच्या इंजिनालाही मोठे नुकसान झाले. काही डबे रुळावरून घसरले आणि जागोजागी प्रवासी अडकले. local-train-and-goods-train-collide-in-bilaspur स्थानिक नागरिक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले की, सर्व बचाव आणि वैद्यकीय संसाधने घटनास्थळी तात्काळ पाठवण्यात आली आहेत. बिलासपूर येथील सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये आपत्कालीन वॉर्ड तयार करण्यात आले असून डॉक्टरांची विशेष टीम सतत उपचार देत आहे. या अपघातामुळे हावडा-कटनी रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक गाड्या रद्द किंवा मार्गांतरित करण्यात आल्या आहेत. सिग्नल आणि ओव्हरहेड वायरला नुकसान झाल्याने मार्ग पुन्हा सुरू करण्यात वेळ लागणार आहे.
 
सौजन्य : सोशल मीडिया 
रेल्वे प्रशासनाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून, प्रवाशांना हेल्पलाइन नंबरद्वारे माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके सतत घटनास्थळी मदतकार्य करत आहेत.