महाराष्ट्र केसरी सिंकदर शेखची जमीन मंजूर

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Maharashtra Kesari Sinkar Shaikh महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध कुस्तीपटू, ‘रुस्तम-ए-हिंद’ आणि ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाने गौरवलेला सिंकदर शेख अखेर जेलबाहेर आला आहे. पंजाब पोलिसांच्या ताब्यात गेल्यानंतर केवळ काही दिवसांतच त्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. ३० ऑक्टोबर रोजी मोहाली येथे सीआयए पथकाने सिंकदर शेखला चार अन्य संशयितांसह ताब्यात घेतले होते. पोलिसांनी ही कारवाई शस्त्र तस्करी प्रकरणाशी संबंधित असल्याचं सांगितलं होतं. तपासादरम्यान आरोपींकडून सुमारे दोन लाख रुपयांची रोकड, एक .45 बोर पिस्तुल, चार .32 बोर पिस्तुले, काही काडतुसे आणि स्कॉर्पिओ-एन तसेच एक्सयूव्ही अशा दोन गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी खरड पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Maharashtra Kesari Sinkar Shaikh
 
या घटनेनंतर महाराष्ट्रभरात खळबळ उडाली होती. सिंकदर शेखसारख्या नामांकित कुस्तीपटूवर असे आरोप झाल्याने क्रीडा क्षेत्रातही चर्चेचा विषय निर्माण झाला. मात्र शेखच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप फेटाळले आणि त्याच्यावर अन्याय झाल्याचं ठामपणे सांगितलं. दरम्यान, सिंकदरच्या सुटकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट हस्तक्षेप केला. त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी चर्चा करून संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि योग्य न्याय मिळावा अशी मागणी केली. मान यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेत तपास निष्पक्षपणे करण्याचे आश्वासन दिले होते. अखेर तीन दिवसांच्या तगड्या प्रयत्नांनंतर न्यायालयाने सिंकदर शेखला जामीन मंजूर केला आहे .