कानपूर, 
man-killed-live-in-partner-kanpur कानपूरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. रायपूरवा परिसरात लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा खून केल्याच्या आरोपावरून वाहिद नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत त्याने केलेल्या कबुलीजबाबाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.
 
  
वाहिदने पोलिसांना सांगितले की, “मी तिला इतर पुरुषांशी संबंध ठेवू नकोस अस सांगत होतो, तर ती मला इतर महिलांपासून दूर राहायला सांगत होती. मी तिला धर्मांतर करून माझ्याशी निकाह करण्यास सांगितले, पण ती तयार झाली नाही. २९ ऑक्टोबरच्या रात्री आम्ही दारू आणि चिकन पार्टी केली. त्यादरम्यान पुन्हा या विषयावर वाद झाला आणि रागाच्या भरात मी तिचा दुपट्ट्याने गळा आवळून खून केला,” असा खुलासा आरोपीने केला. पोलिसांच्या माहितीनुसार, ३५ वर्षीय महिला आपल्या आईच्या निधनानंतर त्यांच्या घरात राहत होती आणि वाहिद तिच्यासोबत लिव-इनमध्ये राहू लागला होता. man-killed-live-in-partner-kanpur गुरुवारपासून घराला कुलूप लागले होते. शनिवारी घरातून दुर्गंध येत असल्याचे आणि रक्त वाहत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. घराचे दार तोडल्यावर तख्ताखाली महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला.
घरातून वाहिदचा आधार कार्डही सापडला होता, मात्र तो घटनानंतर फरार झाला होता. अखेर पोलिसांनी अफीम कोठी चौकात त्याला पकडले. डीसीपी श्रवण कुमार यांनी सांगितले की, वाहिदने महिलेचे इतर पुरुषांशी संबंध असल्यामुळे रागातून खून केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार वाहिदने स्वतः थेट थाण्यात हजर होत आत्मसमर्पण केले. त्याने सांगितले की, “हत्या केल्यानंतर मी घराला कुलूप लावून निघून गेलो. man-killed-live-in-partner-kanpur नशा उतरल्यावर मला भीती वाटू लागली की पोलिस माझा एनकाउंटर करतील. त्यामुळेच मी थेट थाण्यात आलो,” असे त्याने सांगितले. मात्र रायपूरवा पोलिसांनी या प्रकरणातील अटक आपली कामगिरी म्हणून मिरवली आहे.