म्हैसूर,
Queen Trishika of the royal family! ४०० वर्षांच्या शापातून राजघराण्याला मुक्त करणारी राणी त्रिशिका, तिच्या सौंदर्यापेक्षा तिचा साधेपणा आणि साड्यांतील शाही नजाकतीसाठी अधिक ओळखली जाते. म्हैसूरच्या वाडियार घराण्याचा हा शाही वारसा आजही जिवंत आहे. या घराण्याचे सध्याचे अधिपती, यदुवीर कृष्णदत्त चामराजा वाडियार, देशातील सर्वात श्रीमंत राजघराण्यांपैकी एकाचे २७ वे राजा मानले जातात. अंदाजे ८०,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा हा वाडियार घराणा, कधीकाळी एका शापामुळे वारसापासून वंचित राहिला होता. मात्र, ४०० वर्षांनंतर डुंगरपूरच्या राजकन्या त्रिशिका सिंग यांच्या विवाहानंतर हा शाप संपला आणि इतिहा साने नव्या अध्यायाला सुरुवात झाली.
 
 
राणी त्रिशिका या नावामागे केवळ शाही वंशपरंपरा नाही, तर विनम्रतेची एक सुंदर कहाणी दडलेली आहे. कोट्यवधींच्या संपत्तीच्या घराण्यात लग्न करूनही ती नेहमीच साध्या, पारंपरिक पोशाखात दिसते. तिचा आवडता परिधान म्हणजे साडी  मग ती रेशमी असो, लिनेन किंवा हलकी शिफॉन. कोणत्याही साडीमध्ये तिची शालीनता आणि शाहीपणा एकत्र खुलून येतो.
राजवाड्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये ती अनेकदा गुलाबी किंवा सोनरी झळाळीच्या रेशमी साड्यांमध्ये दिसते. तिच्या पोशाखात दागिन्यांचा अतिरेक नसतो, पण तिच्या साडीवरील बारकाईची झलक आणि तिची आत्मविश्वासपूर्ण उभारी पाहून प्रत्येकाची नजर तिच्यावर खिळते. त्रिशिकाच्या जीवनकथेतील सर्वात मोठा अध्याय म्हणजे वाडियार घराण्याला शापातून मुक्त करणे. शतकानुशतकांपासून या घराण्यात वारस जन्माला येत नव्हता. पण २०१६ मध्ये त्रिशिका आणि राजा यदुवीर यांच्या विवाहानंतर, २०१७ मध्ये तिने एका पुत्राला जन्म देऊन घराण्याचा वारसा पुन्हा प्रस्थापित केला. तो क्षण
 
 केवळ घराण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण म्हैसूरसाठी ऐतिहासिक ठरला. अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होताना तिचा साधेपणा पुन्हा एकदा चर्चेत आला. पिवळ्या साडीतली ती राणी, सोनरी बॉर्डर आणि मिनिमल दागिन्यांसह, सौंदर्य आणि मर्यादेचं प्रतीक भासत होती. आज राणी त्रिशिका सिंग केवळ म्हैसूरच्या राजघराण्याची वारसदार नाही, तर ती भारतीय स्त्रीच्या परंपरा, संस्कार आणि आधुनिकतेचा सुंदर संगम आहे. एक अशी राणी, जिने शतकांचा शाप मोडून शाही परंपरेला नवजीवन दिलं आणि आपल्या साधेपणाने प्रत्येकाचं मन जिंकलं.