वेध. . 
 
नितीन शिरसाट
agricultural crops परतीच्या पावसामुळे महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि कोकण भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  विदर्भातील  अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे.  परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेली खरीप पिके- जसे  सोयाबीन, कापूस, मका आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. बुलढाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. यादरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील 11 महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यातही परतीच्या पावसाने थैमान घातले. यात हजारो हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. खरीप हंगामात कर्जबाजारी होत शेतकऱ्यांनी नगदी पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी केली. पावसाने साथ दिल्याने पीकही बहरले. शेंगा लागल्यानंतर अळींनी आक्रमण केले. यातून मार्ग काढत पीक वाचविले. सोंगणी सुरू केली. अनेक ठिकाणी पीक सोंगून ठेवण्यात आले. यापूर्वीच मुसळधार पावसाचा तडाखा बसला. शेतात पाणी साचल्याने रचून ठेवलेल्या सूड्या पाण्याखाली गेल्या. या पिकाला अंकुर फुटणे किंवा सडण्याचा धोका व्यक्त होत आहे. बुलढाणा, मोताळा तालुका आणि परिसरात काही भागांत झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, पावसामुळे जनावरांचा चारा वाहून गेला, घरांमध्ये पाणी शिरले, रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली आणि गावोगाव वीजपुरवठा खंडित झाला.
 
 
  
 
 
काही शेतकऱ्यांच्या शेततळ्यांमधील साचलेले पाणी ओसंडून वाहिल्याने बांध फुटले, तर नाल्यांच्या काठावर असलेली शेती पूर्णपणे नष्ट झाली. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार काही भागांत जमिनीतील ओल वाढल्याने हरभऱ्याच्या पेरणीस पोषक स्थिती आहे. परंतु ज्या भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला, तिथे पाणी साचल्यामुळे बियाणे कुजणे, जमिनीची धूप आणि पोत बिघडण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बी-बियाणे व खतांवर खर्च करावा लागणार आहे. प्रशासनाकडून नुकसान पंचनाम्याची हालचाल तालुका कृषी अधिकारी यांनी नुकसानीचे प्राथमिक पंचनामे सुरू केल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने नुकसानभरपाई, बियाणे अनुदान आणि व्याजमाफीची मागणी केली आहे.  केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी नुकसानग्रस्त भागांत पाहणी केली असता अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी परतीचा पाऊस आमचं जगणंच पाण्यात घेऊन गेला अशी व्यथा व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक संकट वाढले आहे.  अनेक शेतकèयांकडे मागील दोन-तीन हंगामांपासून कर्जाचा बोजा वाढला आहे. खरीप पिकांचे उत्पादन कमी आणि बाजारभावही अपुरा मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणितं कोलमडली आहेत. रबी हंगामात काही दिलासा मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी बियाणे व खत खरेदीसाठी पुन्हा कर्ज घेतले. परंतु पाऊस झाल्याने आता ते बीज वाया गेल्याचे दिसत आहे. या परिस्थितीत शासनाने सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.agricultural crops सरसकट कर्जमाफी योग्य की अयोग्य तर कर्जमाफीचे समर्थन करणाऱ्यांचे मत शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या कष्टाने शेती टिकवली आहे, त्यांच्यावर नैसर्गिक आपत्ती, महागाई, उत्पादन घट आणि दरकपातीचे संकट एकत्र आले आहे. अशा वेळी शासनाने सरसकट कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना जगण्यासाठीचा दिलासा द्यावा. कर्जमाफी ही नैसर्गिक आपत्तिग्रस्त शेतकèयांसाठी अत्यावश्यक ठरू शकते पण ती लक्ष्यित आणि नियोजित असावी. ज्या भागांत शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी विशेष कर्जमाफी आणि व्याजमाफी योजना जाहीर करणे उचित ठरेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना नव्या हंगामासाठी शून्य टक्के व्याजदराने नवीन कर्ज उपलब्ध करून देणे, तसेच पीकविमा दाव्यांचा तत्काळ निपटारा करणे आवश्यक आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा या मागणीसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकरी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात शेतकरी नेते राजू शेट्टी, डॉ. अजित नवले, महादेव जानकर, वामन चटप, रविकांत तुपकर यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले होते. शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी कर्जमाफीबाबत शासनाची सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे सध्या पहिल्यांदा अतिवृष्टीच्या मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे आवश्यक आहे.
9881717828