तभा वृत्तसेवा
राळेगाव,
Ashok Uike : भारताच्या एकात्मतेचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी एकता दौड रन फॉर युनिटी चे आयोजन करण्यात आले होते. याच अनुषंगाने जळका येथे 3 नोव्हेंबर रोजी एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या भव्य पदयात्रेत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुलसिंह चौहान यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या पदयात्रे दरम्यान शहराध्यक्ष शुभम मुके, तालुका उपाध्यक्ष डॉ. कुणाल भोयर, माजी सभापती प्रशांत तायडे, प्रवीण कोकाटे, संजय काकडे, विशाल पंढरपूरे, अनिल फुटाणे, प्रज्वल जगताप, आशिष इंगोले, संदीप तेलंगे, शारदानंद जयस्वाल, निखिल राऊत, बबन भोंगारे, नितीन झाडे, संदीप पेंदोर, आकाश कुळसंगे तसेच कार्यकर्ते, विद्यार्थी, परिसरातील नागरिक, महिला, युवकांनी पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.