शिवशाही दुभाजकावर चढली

ऑटोला वाचविण्याचा प्रयत्न

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
तिवसा, 
shivshahi-climbed-the-divider नागपूरहून अमरावतीमार्गे अकोलाकडे जाणार्‍या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला मंगळवारी सकाळी अपघाताचा सामना करावा लागला. ही घटना सकाळी अंदाजे ९.३० वाजता शेंदोळा खुर्दजवळील मोझरी बायपास मार्गावर घडली.
 

shivshahi-climbed-the-divider 
 
गणेशपेठ, नागपूर आगाराची ही शिवशाही बस तळेगाव येथून अमरावतीमार्गे अकोलाकडे जात असताना अचानक समोर ऑटो आल्याने चालकाने बचावात्मक प्रयत्न केला; मात्र त्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही बस थेट महामार्गाच्या दुभाजकावर चढली. अपघातात बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून समोरील अ‍ॅक्सल तुटले व पुढील चाक निखळले. अपघाताची तीव्रता पाहता काही क्षण प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तरीदेखील सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी, चालक व वाहक सुखरूप बचावले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागपूर आगारातून निघणारी ही शिवशाही बस दररोज तळेगाव, अमरावती, अकोला या मार्गावर धावत असते. shivshahi-climbed-the-divider मंगळवारी सकाळी प्रवासादरम्यान अचानक समोर आलेल्या ऑटोमुळे हा अपघात झाला. बस दुभाजकावर धडकताच ती काही मीटरपर्यंत फरफटत गेली. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी बसचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या अपघातानंतर महामंडळाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळ गाठून वाहनाची पाहणी केली. बसला मोठे यांत्रिक नुकसान झाले असून ती मार्गावरून हटविण्याचे काम सुरू आहे. जीवितहानी टळल्याने प्रवासी व नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त करण्यात येत आहे.