टीईटी निर्णयाविरोधात रविवारी मूक मोर्चा

पुनर्विलोकन याचिका दाखल करा !

    दिनांक :04-Nov-2025
Total Views |
अमरावती, 
march-on-sunday-against-tet-decision शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात सापडल्याची भीती निर्माण झाली आहे. या पृष्ठभूमीवर शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने ९ नोव्हेंबरला रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षकांचा मूक मोर्चा काढण्याचे आयोजन केले आहे.
 
 
march-on-sunday-against-tet-decision
 
शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. राज्यातील सर्व शिक्षकांनी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करावा, असे आवाहन मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस राजेश सुर्वे यांनी केले आहे. तसेच अमरावती येथे ९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अमरावती जिल्हा समन्वय शिक्षक समितीने केले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्यावतीने ४ ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र त्यापूर्वीच १ ऑक्टोबर रोजी राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. march-on-sunday-against-tet-decision त्यावेळी त्यांनी टीईटीबाबत शासनाच्यावतीने पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात येईल, असे सर्व संघटनेच्या पदाधिकार्‍यांसमोर कबूल केले होते. या आश्वासनानंतर संघटनेचा मूक मोर्चा स्थगित करण्यात आला होता. मात्र, शासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारची सर्वोच्च न्यायालय पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली नाही. यामुळे शासनाच्या विरोधात ९ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचे आयोजन करण्यात आले आहे.